jio
jio Sakal
विज्ञान-तंत्र

दर महिना फक्त 68 रुपये खर्च; Jio चे हे रिचार्ज प्लॅन चालतात 11 महिने

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमी काहीतरी खास ऑफर्स घेऊन येत असते. सघ्या जिओ वापरकर्त्यांसाठी 2 प्रकारचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. एक जे अतिशय किफायतशीर आहेत पण त्यांना मर्यादित डेटा दिला जातो मिळतो तर दूसरा रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागतात. पण या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अधिक डेटा देखील मिळतो. आज आपण रिलायन्स जिओच्या अशा 2 स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात 11 महिन्यांची वैधता दिली जाते. जिओ फोनसाठी एक रिचार्ज प्लॅन आहे ज्यासाठी तुम्हाला महिन्याला 70 रुपयांपेक्षा कमी रुपये किंमत द्यावी लागेल.

एका महिन्यासाठी 68 रुपये खर्च, 11 महिन्यांची वैधता

जिओ फोनसाठीचा हा प्लॅन 749 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 336 दिवसांची म्हणजेच 11 महिन्यांची वैधता मिळते. या किफायतशीर रिचार्ज प्लॅनमध्ये दर 28 दिवसांनी 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा तुम्हाला मिळतो. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंग उपलब्ध असून दर 28 दिवसांनी 50 एसएमएस पाठवता येतील. तसेच, जिओ अॅप्सची सदस्यता मोफत दिली जाते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ​​मासिक 68 रुपये खर्च येतो.

दरमहा 118 रुपये खर्च, 11 महिने वैधता

रिलायन्स जिओचा हा प्लॅन 11 महिन्यांची वैधतेसह येतो याची एकून किंमत 1299 रुपये आहे. ही रिलायन्स जिओची व्हॅल्यू प्लॅन आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये एका महिन्याला तुम्हाला 118 रुपये पडतात. प्लॅनमध्ये यूजर्सना 24GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंगसह 3600 एसएमएस देखील फ्री पाठवता येतील. या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे.म

Latest Marathi News Live Update : जालन्यात शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठींबा

Saudi Arabia: थेट खून करण्याचाही आदेश...न्यूयॉर्कपेक्षा ३३ पट मोठं शहर उभारत आहे सौदी

IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

Fact Check : लोकसभा निवडणुकीसाठी परदेशातून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना मदत जाहीर करणारे ते व्हायरल पत्र खोटे

SCROLL FOR NEXT