आता पोस्टपेड प्लॅन्सही होणार महाग! 'या' कंपन्यांची तयारी सुरू
आता पोस्टपेड प्लॅन्सही होणार महाग! 'या' कंपन्यांची तयारी सुरू esakal
विज्ञान-तंत्र

आता पोस्टपेड प्लॅन्सही होणार महाग! 'या' कंपन्यांची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा

अलीकडे खासगी दूरसंचार कंपन्यांनी (रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया) त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत.

अलीकडे खासगी दूरसंचार कंपन्यांनी (Private telecommunications companies) (रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea)) त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, मोबाईल युजर्सचा त्रास इथेच थांबत नाही. असे वृत्त आहे, की आता कंपन्या त्यांच्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किमती देखील वाढवू शकतात. फायनान्शियल एक्‍स्प्रेसच्या अहवालानुसार, इमर्जिंग मार्केट्‌स टेक्‍नॉलॉजी, मीडिया आणि एंटरटेन्मेंट आणि टेलिकम्युनिकेशन्सचे (Emerging Markets Technology, Media & Entertainment & Telecommunications) लीडर EY प्रशांत सिंघल (Prashant Singhal) म्हणाले की, प्रीपेडनंतर आता पोस्टपेड प्लॅन्सच्या किमती देखील वाढू शकतात.

रिपोर्टनुसार, Airtel आणि Vodafone Idea टेरिफ वाढवू शकतात. प्रशांत सिंघल यांच्या मते, दरात वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण भारतातील दर जगातील सर्वात स्वस्त आहेत आणि आता प्रीपेड महाग झाल्यानंतर पोस्टपेड प्लॅन्स देखील महाग होऊ शकतात. विशेष गोष्ट अशी आहे, की पोस्टपेड ग्राहकांना किंमतवाढीचा फारसा परिणाम होत नाही आणि ते सहसा त्यांच्या प्लॅन्स सुरू ठेवतात.

कंपन्यांचे टार्गेट एआरपीयू वाढवणे

टेलिकॉम कंपन्यांनी आधीच हे स्पष्ट केले आहे, की प्रति युजर सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी प्लॅनच्या किमती वाढवणे आवश्‍यक आहे. प्रीपेड टेरिफ वाढवल्याने महसूल वाढीला मदत होईल, तर पोस्टपेड प्लॅन वाढवल्याने कंपनीला अधिक आधार मिळेल. विशेषतः व्होडाफोन-आयडिया (Vi) ला त्याची सर्वात जास्त गरज आहे. Vodafone Idea चा ARPU सध्या 109 रुपये आहे आणि भारती Airtel चा 153 रुपये आहे. Reliance Jio साठी ARPU 143.6 रुपये आहे.

कंपन्यांचा वाढतोय सातत्याने खर्च

भारतातील दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) संपूर्ण भारतातील मोबाईल नेटवर्क तयार करण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये अतिरिक्त स्पेक्‍ट्रम खरेदी आणि स्थापनेचा खर्च, संशोधन आणि विकास (R & D) उत्तम सेवा देण्यासाठी, देयके, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर अनेक खर्च समाविष्ट आहेत. याउलट, भारतातील स्वस्त टेलिकॉम सेवेमुळे कंपन्या ग्राहकांकडून फारच कमी कमाई करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICU मध्ये आजारी वडिलांसमोर लागले दोन मुलींचे लग्न, डॉक्टर-नर्स झाले वराती, नंतर... डोळे पाणावणारी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

SCROLL FOR NEXT