Experts Warn: AI Companies Hiding Critical 'Human Extinction' Risks esakal
विज्ञान-तंत्र

AI Threat : एआयमुळे मानवाचं अस्तित्त्व संपणार? कंपन्या तुम्हाला ठेवताहेत धोक्यात; 'या' पत्रातून झालाय धक्कादायक खुलासा

OpenAI and DeepMind : मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी समोर आणलीये धक्कादायक माहिती ,वापरकर्त्यांना ठेवलं जातंय धोक्यात

Saisimran Ghashi

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवजातीसाठी मोठं धोकादायक ठरू शकते, असा इशारा गुगलच्या DeepMind, OpenAI आणि Anthropic या कंपन्यांच्या माजी कर्मचाऱ्यांनी एका संयुक्त पत्रात दिला आहे. या पत्रात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स आणि डीप लर्निंगवर काम करणारे प्रसिद्ध संगणिक शास्त्रज्ञ डॉ. योशुआ बेंगियो, ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जनक’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन आणि ब्रिटिश संगणिक शास्त्रज्ञ स्टुअर्ट रसेल यांचेही समर्थन आहे.

हे माजी कर्मचारी आपल्या पत्रात म्हणतात की, कृत्रिम बुद्धिमत्ता माहितीचा चुकीचा प्रसार करू शकते, समाजातील असमानता वाढवू शकते आणि अगदी स्वायत्त शस्त्रास्त्र प्रणाली बनवू शकते, ज्यामुळे मानवी जीवनच धोक्यात येऊ शकते. या धोकादायक परिस्थितीकडे जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि सरकारांनी डोळेझाक करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणाऱ्या कंपन्यांकडे त्यांच्या सिस्टम्सच्या क्षमता आणि मर्यादांबद्दल बरीच गुप्त माहिती आहे. ही माहिती ते स्वेच्छेने लोकांशी शेअर करत नाहीत असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. तसेच, या कंपन्यांवर कोणतेही सरकारी नियंत्रण नसल्यामुळे, त्यांच्या बोर्डाच्या गोपनीयतेच्या करारांमुळे ही माहिती बाहेर येऊ शकत नाही, असेही या माजी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

या संशोधनाशी संबंधित धोकादायक बाबींबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यासाठी सरकारकडून कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने आणि कंपन्यांकडून कारवाई होण्याची भीती असल्याने आम्ही याबद्दल बोलत नसल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या माजी कर्मचाऱ्यांच्या चिंतांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींनी सपोर्ट केला आहे. यावरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाकडे आणि वापराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या क्षमतेमुळे हे तंत्रज्ञान जबाबदारीने आणि सुरक्षितपणे विकसित करणे आणि वापरणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूल आणि एअर फोर्स बाल भारती स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT