AI Photo Editing esakal
विज्ञान-तंत्र

AI Photo Editing : AI मुळे आता फोटो एडिटिंग झालं सोपं.! 'या' बेस्ट टुल्सच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात बनवा खास फोटो

AI Photo Editing Tools : AI मुळे आता फोटो एडिटिंग करणे देखील सोपे झाले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

AI Photo Editing Tools : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात AI  मुळे आता डिजिटल जग मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. AI चे अनेक आश्चर्यकारक फिचर्स डिजिटल जगात काम करणाऱ्या लोकांची कामे सोपी करत आहे. चॅटजीपीटी देखील बायोडाटा लिहिण्यापासून ते राजीनामा लिहिण्यापर्यंत सर्व कंटेंटची काम अवघ्या काही मिनिटांमध्ये करत आहे.

AI मुळे आता फोटो एडिटिंग करणे देखील सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला काही फोटो एडिटिंग करणाऱ्या AI टुल्सची मदत घ्यावी लागेल. अवघ्या काही मिनिटांमध्ये हे एडिटिंग करता येत असल्याने फोटो अप्रतिम दिसतात. कोणते आहेत हे AI फोटो एडिटिंग टूल्स? चला तर मग जाणून घेऊयात.

लूमिनर नियो (Luminar Neo)

लूमिनर नियो हे AI एडिटिंग टूल विंडोज आणि मॅकवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला AI एडिटिंग केवळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर करायचे असेल तर, हे टूल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. वापरण्यास सोपे असलेले हे टूल विनामूल्य असून जर तुम्हाला कायमस्वरूपी हवे असेल तर तुम्ही सशुल्क अर्थात पेड व्हर्जन देखील याचे घेऊ शकता.

फोटो एडिटिंगसाठी हे टूल अतिशय उत्तम आहे. या टूलमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे टेंम्प्लेट्स देखील मिळू शकतात. यासोबत इतर अनेक प्रकारची फोटो एडिटिंग आणि फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.

बीफंकी (Befunky)

बीफंकी हे AI फोटो एडिटिंग टूल वेब अ‍ॅप, IOS आणि अ‍ॅड्रॉईड अ‍ॅपवर उपलब्ध आहे.  अ‍ॅप फॉर्ममध्ये उपलब्ध असलेले हे फोटो एडिटिंग टूल युझर फ्रेंडली असून वापरण्यास अतिशय सोपे आहे. जर तुम्हाला लवकर फोटो एडिटिंग करून हवी असेल तर त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल एडिटिंगसोबत अनेक ऑप्शन्स मिळू शकतील.

पिक्सलर (Pixlr)

पिक्सलर हे AI फोटो एडिटिंग टूल वेब अ‍ॅप, विंडोज, मॅक IOS आणि अ‍ॅड्रॉईड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. य फोटो एडिटिंग टूलमध्ये AI चे भरपूर फिचर्स आहेत. या फिचर्सच्या मदतीने तुम्ही फोटो क्वालिटी देखील उत्तम बनवू शकता.  

सर्वात महत्वाची बाब ही आहे की, हे टूल 100 % ऑटोमेटिक फोटो एडिटिंगचा ऑप्शन देखील देते. त्यामुळ, फोटो एडिटिंगची क्वालिटी आणखी सुधारते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT