AI Tool Prediction eSakal
विज्ञान-तंत्र

AI Tool : कोणता कर्मचारी नोकरी सोडायच्या तयारीत? बॉसला आधीच सांगणार 'एआय टूल'

AI Tool Prediction : एआय टूल्सचं पेव वाढत असतानाच असे कित्येक टूल्स विकसित करण्यात आले आहेत जे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भविष्यवाणी करतात.

Sudesh

AI Tool Predicts Resign : एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जाणार की वाढणार हा वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्याबाबत आपल्याला नजीकच्या भविष्यात कळेलच. मात्र, सध्या वैज्ञानिकांनी असं एक एआय टूल विकसित केलं आहे, जे एखादा कर्मचारी कधी नोकरी सोडू शकतो याची माहिती देईल.

एआय टूल्सचं पेव वाढत असतानाच असे कित्येक टूल्स विकसित करण्यात आले आहेत जे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भविष्यवाणी करतात. काही एआय टूल्स तर तुमचा मृत्यू कधी होणार याचाही अंदाज वर्तवतात. आता असंच एक एआय टूल तुम्ही नोकरी कधी सोडाल याची भविष्यवाणी करत आहे. जपानी रिसर्चर्सनी मिळून हे AI Tool तयार केलं आहे.

टोकियो सिटी विद्यापीठाचे प्राध्यापक नारुहिको शिरातोरी (Naruhiko Shiratori) यांनी एका स्टार्टअपच्या मदतीने हे टूल तयार केलं आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या टूलचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.

कसं काम करेल टूल?

हे एआय टूल कित्येक गोष्टींचं विश्लेषण करून माहिती देईल. एखाद्या कर्मचाऱ्याचा सुट्टी घेण्याचा पॅटर्न, दैनंदिन उपस्थिती तसंच यापूर्वी काम सोडलेल्या कर्मचाऱ्यांचा डेटा अशा विविध माहितीच्या आधारे कंपनीमध्ये यापुढे कोण नोकरी सोडू शकतं याची माहिती हे एआय टूल देईल.

सध्या कित्येक कंपन्यांमध्ये या टूलची चाचणी सुरू आहे. या टूलमुळे एखादा कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत असेल तर त्याबाबत आधीच मॅनेजर्सना माहिती मिळणार आहे. यामुळे मॅनेजर किंवा HR त्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून, त्याच्या समस्यांचं निवारण करून त्याला आपला विचार बदलण्यासाठी सांगू शकतात. यामुळे कंपन्यांमधील कर्मचारी गळती थांबण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT