Airtel 
विज्ञान-तंत्र

Airtel चा नवीन प्रीपेड प्लॅन; डेटा सोबत मिळते 77 दिवसांची व्हॅलिडिटी

सकाळ डिजिटल टीम

Airtel Prepaid Plan : एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड प्लॅनचे (Airtel Prepaid Plan rates) दर वाढवले ​​आहेत, या दर वाढीनंतर आता कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी गुपचूप एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. एअरटेलच्या नवीन प्लॅनची ​​किंमत 666 रुपये असून आज आपण या प्लॅनचे फायदे आणि वैधता याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही देखील एअरटेल वापरकर्ते असाल आणि 700 रुपयांच्या खाली नवीन प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकतो.

एअरटेलचा 666 रुपयांचा प्लॅन

या Airtel रिचार्ज प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना 77 दिवसांची वैधता आणि त्यासोबत दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जात आहे, त्यानुसार, या प्लॅनमध्ये 115.5 GB डेटा मिळेल. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.

तसेच 666 रुपयांच्या एअरटेलच्या या प्लॅन मध्ये तुम्हाला Amazon प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, अपोलो 24/7 सर्कल 3 महिन्यांसाठी, शॉ अकादमीचा विनामूल्य ऑनलाइन कोर्स, FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून आणि Wink Music चा फ्री एक्सेस देण्यात येतो.

Vodafone Idea ने नुकताच आपला Vi 666 प्लॅन देखील लाँच केला आहे , या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS हे 77 दिवसांच्या वैधतेसह दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight ऑफर करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT