World Cup Recharge Plans eSakal
विज्ञान-तंत्र

ICC World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी एअरटेल अन् जिओने लाँच केले विशेष प्लॅन्स; स्वस्तात पाहता येणार सामने

Airtel World Cup Plans : एअरटेलने 99 आणि 49 रुपयांचे दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.

Sudesh

यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात झाली आहे. डिज्नी+हॉटस्टारवर या वर्ल्डकपमधील सामने मोफत पााहता येणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं आहे. आता एअरटेल आणि जिओ या कंपन्यांनी देखील क्रिकेट फॅन्ससाठी विशेष प्लॅन्स लाँच केले आहेत.

वर्ल्डकपमधील सामने अगदी स्वस्तात पाहता यावेत यासाठी एअरटेलने दोन पॉकेट फ्रेंडली प्लॅन लाँच केले आहेत. तर, जिओने देखील मासिक, तिमाही आणि एका वर्षाचे नवीन प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत.

जिओचे पाच प्लॅन

जिओने 388 रुपयांचा मासिक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाचे 100 एसएमएस आणि तीन महिन्यांचं डिज्नी+हॉटस्टार मोबाईल सबस्र्किप्शन अशा सुविधा मिळतील. एका महिन्याच्या 598 रुपयांच्या प्लॅनमध्येही याच सुविधा आहेत, मात्र दैनंदिन डेटा लिमिट 2GB आहे. (World Cup News)

758 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दैनंदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाचे 100 SMS आणि डिज्नी+हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन या सुविधा मिळतात. यातच 808 रुपयांच्या प्लॅनमध्ये दैनंदिन 2 GB डेटासह सारखेच फायदे मिळतात. 3,178 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये दैनंदिन 2GB डेटा, डिज्नी+हॉटस्टार मोबाईल सबस्किप्शन, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाचे 100 SMS अशा सुविधा 365 दिवसांसाठी मिळतात.

जिओने 331 रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅनही लाँच केला आहे. यामध्ये एका महिन्यासाठी 40GB डेटा आणि डिज्नी+हॉटस्टार मोबाईल सबस्र्किप्शन देखील मिळतं. यासाठी तुमच्याकडे एखादा बेसिक प्लॅन असणं गरजेचं आहे. (Sports News)

एअरटेलचे प्लॅन

एअरटेलने 99 आणि 49 रुपयांचे दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन दिवसांसाठी अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट मिळतं. तर 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एका दिवसासाठी 6GB डेटा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT