airtel cheapest annual recharge plan of  1799 rupee with data sms and calling check details
airtel cheapest annual recharge plan of 1799 rupee with data sms and calling check details  Esakal
विज्ञान-तंत्र

रिचार्जचे टेंशन विसरा, पाहा Airtel चा सर्वात स्वस्त एक वर्षाचा प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. यातील एक टेलिकॉम कंपनी म्हणजे एअरटेल (Airtel). एअरटेल देखील आपल्या ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करते. आज आम्‍ही तुम्‍हाला एअरटेलच्‍या एका सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय वार्षिक प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्‍ये तुम्‍हाला आणखी अनेक चांगले बेनिफिट्स मिळत आहेत.

एअरटेलच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, 2,999 रुपयांचे पॅक आणि 3,359 रुपयांचे प्लॅन हे दोन सर्वात लोकप्रिय प्लॅन आहेत. हे दोघे वापरकर्त्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत, परंतु त्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे, प्रत्येकाला त्याचा फायदा कसा घ्यावा हे माहित नाही. दुसरीकडे, जर तुम्हाला एका वर्षासाठी रिचार्ज करायचा असेल आणि बजेट कमी असेल, तर तुम्ही दोन हजारांपेक्षा कमी खर्चाचा प्लॅन रिचार्ज करू शकता.

एअरटेल टेलिकॉम कंपनीच्या या वार्षिक आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 1,799 रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना 365 दिवसांपर्यंत वैधता मिळते. दुसरीकडे, याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय, ग्राहकांना एका वर्षासाठी प्लॅनमध्ये 3,600 मोफत एसएमएस मिळतात.

डेटा

जर आपण या प्लॅन अंतर्गत उपलब्ध डेटाचा विचार केला तर हा प्लॅन 1 वर्षाच्या वैधतेसह 24 GB डेटा ऍक्सेस ऑफर करतो. म्हणजेच हा 24 जीबी डेटा तुम्ही 365 दिवसांसाठी वापरू शकता. त्याच वेळी, 24 जीबी डेटा संपल्यानंतर, तुम्ही इतर डेटा पॅक घेऊन संपूर्ण वर्षभर या प्लॅनचा आनंद घेऊ शकता.

अधिक फायदे आहेत

एअरटेलच्या या पॅकमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त ग्राहकांना इतर काही फायदे मिळतात. या अंतर्गत, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि फ्री म्यूझीक सब्सस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT