airtel prepaid plans 
विज्ञान-तंत्र

Airtel ची ऑफर, निवडक रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय डिस्काऊंट; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Airtel Discount Offer : एअरटेलने त्यांच्या निवडक प्लॅन्ससाठी डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर असून ज्यामुळे ग्राहक स्वस्तात रिचार्ज करू शकतील. एअरटेलकडून ही डिस्काउंट ऑफर 359 आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर दिली जात आहे. कंपनी या रिचार्ज प्लॅनवर 50 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. 359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसाठी वापरकर्त्यांना फक्त 309 रुपये द्यावे लागतील. तसेच, 599 रुपयांचा रिचार्ज 549 रुपयांच्या डिस्काउंट मध्ये मिळेल. मात्र हे रिचार्ज प्लॅन्स फक्त Airtel Thanks अॅपवरच उपलब्ध आहेत.

359 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 359 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 GB हाय स्पीड डेटा दिला जातो. युजर्सना 28 दिवसांत एकूण 56 जीबी डेटा मिळतो. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. तसेच, कंपनी वापरकर्त्यांना 2 GB अतिरिक्त डेटा देत आहे.

599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना प्रतिदिन 3 जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. तसेच दररोज 3 GB ऑफर केला जातो त्यामुळे युजर्सना 28 दिवसात एकूण 84 GB डेटा मिळतो. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल प्लॅनसह येतो.

एअरटेलचे प्री-पेड प्लॅन

एअरटेलने अलीकडेच आपल्या प्री-पेड प्लॅनच्या किंमती 21 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत एअरटेल प्रीपेड प्लॅन रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी महाग झाला आहे. तसेच काही प्लॅन बदलण्यात आले आहेत. असेच अनेक प्लॅन बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT