Airtel Sakal
विज्ञान-तंत्र

Airtel Offer: एअरटेल यूजर्सला मोफत देत आहे तब्बल 50GB डेटा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी यूजर्सला ५० जीबी डेटा मोफत देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Airtel Offer: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवीन ऑफरची घोषणा करत असते. कंपनीच्या पोर्टफोलियामध्ये स्वस्त प्लॅन्सची मोठी लिस्ट आहे. कंपनी प्लॅन्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. आता कंपनीने खास ऑफरची घोषणा केली असून, यांतर्गत यूजर्सला ५० जीबी डेटा मोफत दिला जात आहे. फ्री डेटा बेनिफिट Wynk Music च्या सबस्क्रिप्शनवर मिळेल.

तुम्हाला जर जाहिरातींशिवाय गाणी ऐकायची असल्यास Wynk Music अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. विशेष म्हणजे एअरटेल यूजर्सला या सबस्क्रिप्शनसह ५जीबी आणि ५० जीबी हाय-स्पीड डेटा मोफत मिळेल.

मासिक प्लॅनवर ५जीबी डेटा

तुम्ही जर Wynk Music Premium चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन घेतल्यास ५जीबी हाय-स्पीड डेटा मोफत मिळेल. याशिवाय, अनलिमिटेड स्ट्रीमिंग, हॅलोट्यून्स, डाउनलोड्स आणि अ‍ॅड-फ्री म्यूझिकचा फायदा मिळेल. एअरटेल यूजर्सला या सबस्क्रिप्शनसाठी १४९ रुपयांची फक्त ९८ रुपये खर्च करावे लागतील.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

वर्षभराच्या सबस्क्रिप्शनवर ५०GB डाटा फ्री

तुम्ही जर Wynk Music Premium चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन घेतल्यास ५० जीबी हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत ३०१ रुपये आहे. सबस्क्रिप्शन घेतल्यास तुम्ही वर्षभर जाहिरातींशिवाय गाणी ऐकू शकता. विशेष म्हणजे एअरटेल आणि नॉन-एअरटेल यूजर्सला सबस्क्रिप्शन घेण्याआधी एक महिना मोफत ट्रायल देखील मिळेल. सबस्क्रिप्शन घेतल्यास तुम्हाला गाणी डाउनलोड करणे, अ‍ॅड-फ्री म्यूझिक, पॉडकास्ट आणि लाइव्ह शोज ऐकण्याची सुविधा मिळेल.

हेही वाचा: Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! अर्ध्या किंमतीत मिळतोय Google चा लेटेस्ट स्मार्टफोन, फीचर्स खूपच जबरदस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT