Recharge Plans
Recharge Plans Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: दररोज २.५ जीबी डेटासह येणारे सर्वात स्वस्त प्लॅन्स, डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री

सकाळ डिजिटल टीम

Best Recharge Plans with OTT Benefits: खासगी टेलिकॉम कंपन्या वोडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलकडे यूजर्ससाठी अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर कंपन्यांकडे दररोज २.५ जीबी डेटासह येणारे शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लॅन्समध्ये तुम्ही डिज्नी पल्स हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. दररोज २.५ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Safest Cars in India: भारतातील टॉप-5 सुरक्षित कार, अपघातानंतरही चालक-प्रवासी राहतील सेफ

वोडाफोन आयडियाचा ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे दररोज २.५ जीबी डेटा ऑफर करणारा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. तुम्हाला अ‍ॅप ओनली ऑफर अंतर्गत ५जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल. वीआयच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, ३ महिन्यांसाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्सची सुविधा मिळते.

एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

२८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या एअरटेलच्या या प्लॅन्समध्ये दररोज २.५ जीबी डेटाची सुविधा दिली जाते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. तसेच, ३ महिन्यांसाठी डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल आणि विंक म्यूझिकचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

जिओचा २०२३ रुपयांचा प्लॅन

Jio ने काही दिवसांपूर्वीच २०२३ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ६३० जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT