Recharge Plans Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: प्रियजनांशी बोलणे होणार महाग! Jio-Airtel रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्याची शक्यता

देशातील खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि Vi ग्राहकांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Airtel-Jio Tariff Hike: देशातील खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि Vi ग्राहकांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या १० टक्क्यांपर्यंत टॅरिफ हाइक करण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म Jefferies ने याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

५जी लाँचनंतर टेलिकॉम कंपनी Airtel आणि Jio आर्थिक वर्ष २३, आर्थिक वर्ष २४ आणि आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत वाढ करू शकते. कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्लॅन्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना झटका दिला होता. याचा फायदा देखील कंपन्यांना मिळाला आहे. आता कंपन्या उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. एअरटेलच्या अनेक आधिकाऱ्यांनी ARPU साठी टॅरिफ हाइक केले जाईल असे म्हटले आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मागील तिमाहीत Jio, Airtel आणि Vi च्या ARPU (एव्हरेज रेवेन्यू पर यूजर) मध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही टेलिकॉम कंपनीसाठी ARPU महत्त्वाचा असतो. याद्वारे तुम्ही कंपनीचा परफॉर्मेंस तपासू शकता. जिओच्या ARPU मध्ये ०.८ टक्के वाढ झाली आहे. तर व्हीआयच्या ARPU मध्ये १ टक्के आणि Airtel च्या ARPU मध्ये ४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एअरटेलने काही दिवसांपूर्वीच दोन सर्कलमध्ये आपल्या मिनिमम रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे.

दरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप ५जी रिचार्ज प्लॅन्सची घोषणा केलेली नाही. देशात ऑक्टोबर महिन्यात ५जी सेवा लाँच झाली आहे. जिओने सर्वात स्वस्त ५जी प्लॅन्स लाँच केले जातील, असा दावा केला आहे. परंतु, किंमतीची माहिती दिलेली नाही. एअरटेलने देखील ठराविक शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केली आहे. ५जी सेवा आल्याने आता रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती देखील वाढणार आहेत.

हेही वाचा: Smart TV Offer: मस्तच! फक्त ९९९ रुपये द्या अन् घरी घेऊन जा ३२ इंच टीव्ही, ऑफर खूपच जबरदस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT