Airtel
Airtel  
विज्ञान-तंत्र

Airtel युजर्ससाठी मोठी बातमी! मोबाईल कॉलचे दर वाढणार

सकाळ डिजिटल टीम

एअरटेल युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण या वर्षी कॉल आणि सेवा दर वाढणारक आहेत. कंपनीने याविषयी माहिती दिली आहे. दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल (Airtel) या वर्षी मोबाइल (Mobile) कॉल-सेवा दर सरासरी प्रति युजर २००रूपयांपर्यंत पर्यंत वाढवणार असल्याचे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर २०२१ मध्ये एअरटेलने मोबाइल सेवांचे दर १८ ते २५ टक्क्यांच्या श्रेणीत वाढवले होते. असे दर वाढविणारी ती पहिली दूरसंचार कंपनी ठरली. दर वाढविल्यामुळे डिसेंबर २०२१ मध्ये Airtel चा टेल्कोचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) २.२ टक्‍क्‍यांनी कमी झाला.

दरवाढीविषयी भारती एअरटेलचे एमडी आणि भारत आणि दक्षिण आशियाचे सीईओ गोपाल वित्तल (Gopal Vittal) म्हणाले, की, २०२२ मध्ये कधीतरी टॅरिफ वाढ होण्याची अपेक्षा आहे. पण ते येत्या तीन-चार महिन्यात होईल असे वाटत नाही. कारण सीम एकत्रीकरण(SIM consolidation ) आणि वाढ परत येणे अपेक्षित आहे. पण मला, दर वाढीच्या दुसऱ्या फेरीची अपेक्षा आहे. अर्थात हे दर कसे वाढवावे हे प्रतिस्पर्धींच्या गतीशीलतेवर निश्चित केले जाईल. मात्र आम्ही अलीकडच्या काळात दर नक्की वाढवू शकतो, असेही ते म्हणाले. कंपनीच्या मिटींगमध्ये त्यांनी विश्लेषकाच्या प्रश्नाला उतर देताना हे सांगितले.

दरम्यान, भारती एअरटेलने मंगळवारी तिच्या एकत्रित निव्वळ नफ्यात २.८ टक्क्यांनी घट नोंदवली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी तिसऱ्या तिमाहीत 830 कोटी निव्वळ नफा मिळवला. २०२० साली याच कालावधीत त्यांना ८५४ कोटी नफा झाला होता. भारती एअरटेलचा एकत्रित महसूल १२.६ टक्क्यांनी वाढून २९,८६७ कोटी रूपये झाला आहे. तो डिसेंबर २०२० च्या तिमाहीत २६,५१८ कोटी होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT