Recharge
Recharge Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Recharge: Jio-Airtel-Vi चे भन्नाट प्लॅन्स, दररोज २जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

2GB Daily Data Prepaid Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio कडे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या प्लॅन्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. या कंपन्यांकडे दररोज १ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्क अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, मेसेजचा देखील फायदा मिळतो. Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio च्या दररोज २ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्रीपेड प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Vodafone Idea चे दररोज २ जीबी डेटासह येणारे प्लॅन

Vodafone Idea कडे दररोज २ जीबी डेटासह येणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहे. कंपनीच्या या प्लॅन्सची किंमत २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपये आहे. सध्या ऑफर अंतर्गत ठराविक कालावधीसाठी दररोज ४ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवस, ५६ दिवस आणि ८४ दिवस आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. याशिवाय, ४९९ रुपये किंमतीचे Vodafone Play सबस्क्रिप्शन आणि ९९९ रुपये किंमतीचे ZEE5 सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. कंपनीकडे दररोज १.५ जीबी डेटासह येणारे जास्त वैधतेचे प्लॅन्स देखील आहेत.

Reliance Jio चे दररोज २ जीबी डेटासह येणारे प्लॅन

Reliance Jio कडे २४९ रुपये, ४४४ रुपये, ५९९ रुपये आणि २,३९९ रुपये किंमतीचे शानदार प्लॅन्स उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. याशिवाय, जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी क्रमशः १०००, २०००, ३००० आणि १२००० FUP मिनिटं दिले जातात. या चारही प्लॅन्सची वैधता क्रमशः २८, ५६, ८४ आणि ३६५ दिवस आहे.

जिओकडे २,५९९ रुपये किंमतीचे शानदार प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये २,३९९ रुपये किंमतीप्रमाणेच बेनिफिट्स मिळतील. यात तुम्हाला १० जीबी अतिरिक्त डेटा आणि Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Airtel चे दररोज २ जीबी डेटासह येणारे प्लॅन

Airtel कडे २,९९९ रुपये किंमतीचा शानदार प्लॅन उपलब्ध असून, या प्लॅनची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफतसह अनेक बेनिफिट्स मिळतील. कंपनीकडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा ८३९ रुपयांचा प्लॅन देखील आहे. ५६ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनसाठी ५४९ रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय, २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनसाठी ४९९ रुपये खर्च करावे लागतील. या सर्व प्लॅन्समध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसचा फायदा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT