Apple Devices Sakal
विज्ञान-तंत्र

Alert for Apple Users: सरकारने दिला महत्त्वाचा इशारा! लवकरात लवकर फोन, लॅपटॉप अपडेट करा नाहीतर...

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अॅपल युजर्ससाठी हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे.

वैष्णवी कारंजकर

तुम्ही देखील मॅकबुक, आयफोन किंवा आयपॅड सारखे अॅपल उपकरण वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अॅपल युजर्ससाठी हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. सीईआरटी-इननुसार, हॅकर्स अॅपलचे डिव्हाईस कधीही हॅक करू शकतात. याशिवाय वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याचाही धोका आहे.

CERT-In ने म्हटलं आहे की अॅपलच्या सफारी ब्राउझरमध्ये वेबकिट ब्राउझर इंजिन वापरलं जातं आणि या इंजिनमध्ये एक बग आहे ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. सीईआरटी-इननुसार, या बगचा फायदा घेऊन आयफोन आणि अॅपल वॉचही हॅक केलं जाऊ शकतात. या बगच्या मदतीने युजर्सच्या फोनमध्ये मालवेअरही इन्स्टॉल केलं जाऊ शकतं.

कोणत्या डिव्हाईसेसला धोका आहे?

  • Apple macOS Monterey 12.7 च्या आधीचे व्हर्जन

  • Apple macOS Ventura च्या 13.6 आधीचे व्हर्जन

  • Apple watchOS च्या 9.6.3 आधीचे व्हर्जन

  • 10.0.1 आधीचे Apple watchOS व्हर्जन

  • Apple iOS चे 16.7 आधीचे आणि iPadOS चे 16.7 आधीचे व्हर्जन

  • Apple iOS च्या 17.0.1 च्या आधीच्या आणि iPadOS च्या 17.0.1 च्या आधीचे व्हर्जन्स

  • Apple Safari च्या 16.6.1 आधीचे व्हर्जन्स

अशा बग्स टाळण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमची सिस्टम अपडेट करणे. तुमच्याकडे आयफोन, मॅकबुक किंवा ऍपल वॉच असल्यास, ते लवकरात लवकर अपडेट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT