Signal App Over WhatsApp
Signal App Over WhatsApp 
विज्ञान-तंत्र

प्रायव्हसीबाबत WhatsApp ला तगडा पर्याय; जगातील श्रीमंत व्यक्तीने सुचवलेल्या Signal ऍपविषयी सर्वकाही

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : WhatsApp हे जगातील सर्वांत आधी प्रसिद्धी पावलेले मेसेजिंग ऍप आहे. मात्र, WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक लोक आता पर्यायांच्या शोधात आहेत. या नव्या प्रायव्हसी  पॉलिसीनुसार WhatsApp तुमचा डेटा हा फेसबुक आणि संबंधित कंपन्यांशी शेअर करणार आहे. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीचे हे नवे अपडेट स्विकारण्याशिवाय युझरकडे दुसरा कोणताही अन्य  पर्याय उपलब्ध नाहीये. एकतर हे अपडेट स्विकारा अथवा WhatsApp वरुन निघून जा, असेच हे नवे धोरण सांगते. WhatsApp च्या या साऱ्या नव्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रायव्हसीबाबत सजग असणारे अनेक युझर सध्या Signal आणि Telegram सारख्या पर्यायी मेसेंजिंग ऍपकडे वळत आहेत. यातील Signal हे एक असे ऍप आहे जे युझरकडून डेटाच्या नावावर फक्त लोकांचे कॉन्टॅक्ट नंबरच घेतं. या ऍपचा वापर जगातील अनेक पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी, वकील आणि सिक्यूरिटी एक्सपर्ट्स  मोठ्या प्रमाणावर करतात.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक अ‍ॅप सुचवलं असून सिग्नल अ‍ॅप वापरा असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सिग्नल ट्रेंडमध्ये आहे. म्हणूनच आपण आता या ऍपची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

मोठ्या कॉर्पोरेशनचा मालकी हक्क नाही
Signal Messenger LLC हे ऍप मॉझिलासारख्या एका नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन सिग्नल फाऊंडेशनच्या अंतर्गत काम करतं. जेव्हा Acton ने कंपनी सोडून सिग्नलला 50 मिलीयन डॉलरला विकलं होतं तेंव्हा या ऍपची निर्मिती करण्यात आली होती. एनक्रिप्टेड टेक्स्टींगच्या बाबतीत हे ऍप अत्यंत चांगले आहे. सिग्नल फाऊंडेशन एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे तसेच कोणत्याही एका मोठ्या टेक कंपनीची यावर मालकी नाहीये.
ऍपमध्ये काय राहिल हे तुम्हाला असेल माहिती
या ऍपचा सोर्स कोड सार्वजनिक रित्या उपलब्ध आहे. यामुळे जगभरातील सिक्यूरिटी एक्सपर्ट्स यामध्ये येणाऱ्या अडचणींचा चेक करु शकतात. यामुळे या ऍपला बाकी ऍप्सच्या तुलनेत गतीने दुरुस्त केलं जाऊ शकतं.
सारं काही एनक्रिप्टेड
सिग्नल प्रत्येक गोष्टीला एनक्रिप्ट करतं. यामध्ये आपला प्रोफाईल फोटो, व्हॉईस-व्हिडीओ कॉल्स, अटॅचमेन्ट्स, स्टिकर्स आणि लोकेशन या गोष्टी समाविष्ट आहेत.

हेही वाचा - USE Signal; जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं सांगितला WhatsApp ला पर्याय​
चॅट्सचा बॅकप सुरक्षित 
हे ऍप आपल्या मॅसेजचे असुरक्षित बॅकप्स क्लाऊड्सना पाठवत नाही. क्लाऊडवर गुगल आणि व्हॉट्सएपसहित कुणीही हे बॅकप वाचू शकतो. मात्र, Signal वर एनक्रिप्टेड डेटाबेसमध्ये बॅकप स्टोअर केला जातो. सोबतच ऍप आपल्या सर्व्हरमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सला देखील ठेवत नाही. 
अनेक प्रायव्हसी फ्रेंडली फिचर्स
Signal चे सर्वांत जुने आणि उपयुक्त असे फिचर म्हणजे आपण मेसेज डिसअपीअर करु शकता. हे फिचर अलिकडे व्हॉट्सएपवर आले आहे. युझर्स यासाठी 10 सेंकदांपासून ते एका आठवड्यापर्यंतचा टाइमर सेट करु शकतात. यामुळे आपले कोणतेही जुने चॅट आपोआप गायब होईल. सोबतच  वन-टाइम व्ह्यूएबल मीडिया आणि मेसेंजिंग रिक्वेस्ट्स सारखे अनेक फिचर्स व्हॉट्सएपवर मिळत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT