Amazon Sale eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale : ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ला मोठा प्रतिसाद; पहिल्या एका तासात सेकंदाला ७५ स्मार्टफोन्सची विक्री!

Smartphone Sale : अमेझॉनच्या सेलला पहिल्या ४८ तासांमध्येच साडेनऊ कोटी ग्राहकांनी भेट दिली

सकाळ डिजिटल टीम

‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या ४८ तासांमध्येच साडेनऊ कोटी ग्राहकांनी भेट दिली, तर पहिल्या तासात दर सेकंदाला ७५पेक्षा जास्त स्मार्टफोनची विक्री झाली. सुमारे दहा लाख ग्राहकांना त्याच दिवशी वस्तूंची डिलिव्हरी मिळाली आहे.

‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ला आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा प्रतिसाद मिळाल्याचे ‘ॲमेझॉन’ने म्हटले आहे. ‘प्राइम अर्ली ॲक्सेस’च्या पहिल्या २४ तासांमध्ये प्राइम सदस्यांनी अठरापट अधिक खरेदी केली. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन, होम डेकॉर या सगळ्या क्षेत्रांमधील सुमारे पाच हजार नवीन उत्पादने या ‘फेस्टिव्हल’मध्ये सादर करण्यात आली आहेत. वनप्लस, सॅमसंग, ॲपलसह अनेक उत्पादनांना ग्राहकांनी पसंती दिल्याचे कंपनीने कळवले आहे.

टिअर २ शहरांमध्ये वाढला वापर

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी विक्रेत्यांपैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त विक्रेते ‘टिअर २’ आणि ‘टिअर ३’ शहरांतील आहेत. छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या उलाढलीत ३५ टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त महानगरेतर शहरांतील आहेत.

‘‘यंदाचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सगळ्या दृष्टीने वैशिष्‍ट्यपूर्ण ठरला आहे. ओपनिंगपासून प्राइम सदस्यांच्या विक्रीपर्यंत अनेक उच्चांक नोंदवले गेले आहेत. महिनाभर चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये आम्ही ग्राहकांना आनंद देत राहू,’’ असे ॲमेझॉनच्या भारतातील ग्राहक व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT