लिंक्डइनच्या CEO सोबतच्या मुलाखतीच्या मुलाखतीत अमेझॉन सीईओनी करिअर बद्दलचे मुद्दे मांडले.  esakal
विज्ञान-तंत्र

Amazon CEO Interview : सकारात्मक वृत्ती करिअरची गेमचेंजर! अमेझॉनच्या CEOचा सल्ला!

Positivity Success Key : करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजेत

सकाळ डिजिटल टीम

Success Key : आपल्यातील अनेकजण यशस्वी करिअरची स्वप्न पाहतात. पण यशस्वी होण्यासाठी काय लागतं? बुद्धिमत्ता? कौशल्य? तर अमेझॉनचे CEO अँडी जेसी यांचं म्हणणं आहे की, यशस्वी होण्यासाठी सकारात्मक वृत्ती सर्वात महत्वाची आहे.

लिंक्डइनच्या CEO सोबतच्या मुलाखतीत जेसी म्हणाले, "20-25 वर्षांच्या वयाच्या कोवळ्या वयात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक वृत्ती खूप मोठी भूमिका बजावते." फक्त हसमुख राहणं हाच सकारात्मकतेचा अर्थ नाही, तर त्याचा संबंध चांगल्या टीम मॅन असणं, वेळेत काम पूर्ण करणं आणि आव्हानं स्वीकारण्याची वृत्ती असणं यांच्याशी आहे.

जेसी यांनी या मुलाखती दरम्यान काही प्रश्न विचारत त्यांना करिअर सोबत जोडले.

मी कठोर परिश्रम करतो का?

मी तक्रार करण्यापेक्षा आशावादी राहतो का?

मी दिलेली वचनं पाळतो का?

मी चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतो का?

हे प्रश्न सोपे वाटत असले तरी, अनेकदा त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं असं जेसी सांगतात. ते म्हणतात, "चांगली वृत्ती असणं किती दुर्मिळ आहे हे आश्चर्य वाटतं. आणि त्याचा यशावर खूप मोठा प्रभाव पडतो."

सकारात्मक दृष्टीकोन ठेवलं तर आव्हानं आणि नवीन संधी जसे नवीन प्रोजेक्ट्स किंवा प्रशिक्षण कार्यक्रम स्वीकारण्यासाठी आत्मविश्वास मिळतो. "कम्फर्ट झोन" बाहेर येण्यासाठी सकारात्मक वृत्ती खूप महत्वाची असते.

जेसी यांनी स्वतः 1997 मध्ये 29 वर्षांचे असताना अमेझॉनमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम सुरू केलं. पाच वर्षांनंतर त्यांना एक अनोखी संधी मिळाली. जेफ बेझोस यांचे ते पहिले सल्लागार बनले. या भूमिकेत ते सीईओच्या सर्व बैठकांना उपस्थित असत.

काही सहकाऱ्यांनी या संधीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण जेसी यांनी फक्त सकारात्मक बाजू पाहिली. त्यांनी या संधीला नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची एक संधी म्हणून पाहिलं.आपण कोणत्याही टप्प्यावर असाल, सकारात्मक वृत्तीमुळे कामाच्या ठिकाणी चांगले संबंध तयार होतात,असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chatgpt Down: चॅटजीपीटी डाऊन? जगभरातील अनेक यूजर्समध्ये गोंधळ

ENG vs SA: द. आफ्रिकेने ODI सामना १२५ चेंडूंत जिंकला; मार्करमने १३ चौकारांचा पाऊस पाडत रचला विक्रम

Nashik News : नाशिक होणार मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरचा भाग? कोट्यवधींची गुंतवणूक येणार

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Latest Maharashtra News Updates : २०२५-२६ कापसासाठी किमान किंमत आणि ५५० खरेदी केंद्रांचा आढावा

SCROLL FOR NEXT