Supreme Court Lawyer Loses 38000 rupees in Amazon iPhone15 Scam Online shopping Fraud esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Shopping Fraud : ॲमेझॉनवरून iPhone मागवला अन् सुप्रीम कोर्टाच्या वकिलासोबत झाला हजारोंचा फ्रॉड,नेमकं प्रकरण काय?

Amazon iPhone Fraud : सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे मुकुल पी. उन्नी यांच्यासोबत ॲमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाली आहे.

Saisimran Ghashi

Amazon Online Shopping Fraud : ऑनलाईन शॉपिंगमध्ये आता मोठमोठ्या लोकांचीही फसवणूक करण्याचे प्रयत्न वाढत चालले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे मुकुल पी. उन्नी यांच्यासोबत ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाली आहे.

उन्नी यांनी २१ जुलै २०२४ रोजी अॅमेझॉनवरून आयफोन 15 ची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एक्सचेंज ऑफर अंतर्गत त्यांनी दिली होती. म्हणजेच त्यांचा जुना आयफोन 13 देऊन ते नवीन आयफोन 15 घेणार होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ९:३० वाजता डिलीव्हरी एजंट त्यांच्या घरी आला.

एजंटने त्यांना नवीन फोन दिला आणि नेहमीप्रमाणे ओटीपी (One Time Password) मागितला. उन्नींनी तो ओटीपी दिला आणि त्यांचं जुने आयफोन 13 त्यांनी एजंटला दिले. पण यानंतर खरा खेळ सुरु झाला. एजंटने सांगितलं, "आणखी एक ओटीपी लागणार आहे." उन्नींनी आश्चर्य व्यक्त करत सांगितलं, "आणखी कोणता ओटीपी नाही आला."

एजंट गोंधळून गेला आणि त्यांनी आपल्या सुपरवायझरशी संपर्क साधला. सुपरवायझरने अशोक असे नाव सांगून सांगितलं, "एक्सचेंजसाठी वेगळी टीम आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन परत करा. उद्या पुन्हा येऊन तुमचा फोन घेऊन जाऊ." भरपूर आश्वासनांनंतर उन्नींनी तो नवा फोन परत केला. त्यांच्याकडे एजंट विशाल आणि सुपरवायझर अशोक यांच्या दोन्ही जणांचे फोन नंबर होते.

पुढच्या दिवशी उन्नींनी अॅमेझॉनच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांना सांगण्यात आलं, "जर फोन डिलीव्हरी झाला नाही तर रिफंड केला जाईल." पण चौथ्या दिवशी चौकशी केल्यावर त्यांना ३१ जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं.

३१ जुलै रोजी अॅमेझॉनकडून आलेल्या उत्तरानं मात्र उन्नीं अस्वस्थ झाले. त्यांना कळवण्यात आलं की, " चौकशी पूर्ण झाली आहे आणि रिफंड दिला जाऊ शकत नाही." उन्नींनी आश्चर्य व्यक्त करत सांगितलं, "माझा जुना आयफोन 13 अजूनही माझ्याकडेच आहे. मग एक्सचेंज झाला कसा?" पण यावर काहीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

यानंतर अशोकने उन्नींना पुन्हा फोन केला. त्यांनी उन्नींना विशिष्ट ठिकाणी बोलावलं आणि फोन परत करण्यास सांगितलं. २४ तासात नवीन फोन मिळेल अशीही आश्वासनां दिली. पण पुन्हा फसवणूक होण्याची शंका येऊन उन्नींनी या ऑफरला नकार दिला. या ऑनलाईन फ्रॉडचा सध्या तपास सुरू आहे.

उन्नींच्या या प्रकरणामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना किती काळजी घेण्याची गरज आहे हे अधोरेखित होते. अशा फसवणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहणं आणि ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT