Amazon Sale Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: OnePlus ते Samsung... महागडे स्मार्टफोन्स निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा ऑफर्स

अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोन्सवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Discount on Smartphones: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Amazon वर सुरू झालेला Fab Phones Fest सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. या सेलमध्ये तुम्हाला महागड्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोन खरेदी करताना एसबीआय कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा देखील तुम्हाला फायदा मिळेल.

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये खरेदी करताना बँक ऑफ बडोदा आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डचा वापर केल्यास डिस्काउंटचा फायदा मिळेल. याद्वारे तुम्हाला मिड-रेंज फोन्सवर आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये उपलब्ध या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

या स्मार्टफोन्सवर मिळेल बंपर डिस्काउंटचा फायदा

तुम्ही जर कमी बजेटचा फोन शोधत असाल तर सेलमध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून iQOO Z6 Lite 5G ला १३,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५जी कनेक्टिव्हिटी आणि दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, Samsung Galaxy M13 ला फक्त ९,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हा सॅमसंगच्या सर्वात स्वस्त फोन्सपैकी एक आहे.

Realme Narzo 50A ला देखील तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर हा फोन फक्त ९,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही जर अजून स्वस्त व एंट्री लेव्हल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमी ए१ चांगला पर्याय आहे. डिस्काउंटनंतर हा फोन फक्त ५,८४९ रुपये किंमतीत तुमचा होईल. याशिवाय, रेडमी १०ए ची सुरुवाती किंमत ७,६४९ रुपये आहे.

मिड-रेंज स्मार्टफोन्स देखील स्वस्तात उपलब्ध

सेलमध्ये Samsung Galaxy M33 स्मार्टफोन आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. फोन डिस्काउंटनंतर फक्त १६,९९९ रुपयात तुमचा होईल. तसेच, Realme Narzo 50 Pro ला तुम्ही डिस्काउंटनंतर फक्त २०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. मिड रेंजमध्ये Redmi K50i हा देखील चांगला पर्याय आहे.

रेडमीचा हा फोन २२,९९९ रुपये किंमतीत तुमचा होईल. स्टाइलिश फोन शोधत असाल तर Xiaomi 11 Lite NE 5G हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. सेलमध्ये याची किंमत १९,४९९ रुपये आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G देखील फक्त १८,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT