Amazon Great Freedom Festival eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale Dates : अमेझॉन फ्रीडम फेस्टिवल सेलच्या तारखांमध्ये बदल; जाणून घ्या काय असतील ऑफर्स

Great Freedom Festival : या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि अप्लायन्सेसवर 65 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

Sudesh

शॉपिंगसाठी जर तुम्ही अमेझॉनच्या सेलची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनने आपल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलच्या तारखांमध्ये बदल केला आहे.

यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, हा सेल 5 ते 9 ऑगस्टदरम्यान असणार होता. मात्र, आता हा सेल 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. प्राईम यूजर्सना 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून इन्स्टंट अ‍ॅक्सेस मिळणार आहे. अमेझॉनने आपल्या किकस्टार्टर डील्स कॅन्सल करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

टीव्ही-वॉशिंग मशीनवर डील्स

अमेझॉनच्या या सेलमध्ये रेडमीचा 43 इंच 4K स्मार्ट टीव्ही हा केवळ 23,999 रुपयांना उपलब्ध असेल. या टीव्हीची किंमत साधारणपणे 42,999 रुपये आहे. सॅमसंगचा 47,900 रुपयांचा 43 इंच 4K टीव्हीदेखील केवळ 31,990 रुपयांना घेऊ शकता. (Amazon Sale)

या सेलमध्ये 7,790 रुपयांपासून फ्रीज; 6,999 रुपयांपासून स्मार्ट टीव्ही; आणि 5,990 रुपयांपासून वॉशिंग मशीन खरेदी करता येणार आहे. या किंमती सर्व ऑफर्स लागू केल्यानंतरच्या आहेत. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि अप्लायन्सेसवर 65 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

इतर ऑफर्स

या सेलमध्ये कपडे, शूज आणि इतर प्रॉडक्ट्सवर कमीत कमी 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये पहिल्या खरेदीवर 20 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. सोबतच, प्राईम अर्ली डील्समध्ये तुम्हाला 30 दिवसांची फ्री प्राईम ट्रायल मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT