amazon great indian festival 2022 
विज्ञान-तंत्र

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; जाणून घ्या सवलती, ऑफर्स

सकाळ डिजिटल टीम

amazon great indian festival 2022 : तुम्ही सणासुदीच्या काळात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण Amazon India ने त्याच्या पुढील मोठ्या सेलची तारीख जाहीर केली आहे. ई- रिटेलरने दिलेल्या माहितीनुसार, द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल भारतात 23 सप्टेंबर 2022 रोजी प्राइम सदस्यांना लवकर एक्सेससह सुरू होईल. या आगामी सेलमध्ये सॅमसंग, iQOO, Mi, Redmi, Apple, OnePlus, LG, Sony, BoAt, HP, Lenovo, Fire-Bolt, Noise, इत्यादी कंपन्यांच्या उत्पादनांसह 2,000 हून अधिक नवीन प्रॉडक्ट लॉन्च आणि सवलतींचा समावेश असणार आहे.

23 सप्टेंबरपासून सुरू होणार Flipkart सेल

विशेष म्हणजे, फ्लिपकार्टचा द बिग बिलियन डेज (TBBD) सुरू होत असतानाच Amazon भारतात आपला फेस्टीव्ह सेल आयोजित करेल. हा फ्लिपकार्ट सेल 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भारतात लाइव्ह असेल.

खास काय असेल?

Amazon India ने सांगितले की, The Great Indian Festival दरम्यान खरेदीदारांना 7,500 रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. हे ग्राहकांना Amazon.in वर खरेदी करून किंवा बिल भरून, त्यांचे फोन रिचार्ज करून आणि Amazon Pay वर पैसे घऊन किंवा पाठवून या सवलती अनलॉक करता येतील. तसेच तुम्ही या सणासुदीत सुरू होणाऱ्या सेलदरम्यान खरेदी करताना हे रिवॉर्ड पॉइंट्स वापरू शकता.

कंपनीने असेही म्हटले आहे की जे ग्राहक बिल पेमेंट, रिचार्ज इत्यादींवर पहिला Amazon Pay व्यवहार करतात त्यांना 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला वेलकम ऑफर म्हणून 2,500 रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. तर Amazon Pay लेटर सुरू करणाऱ्या वापरकर्त्यांना 60,000 रुपयांपर्यंतच्या इंस्टट क्रेडिटसह 150 रुपये परत मिळतील.

Amazon India ने असेही म्हटले आहे की जे ग्राहक Amazon Pay UPI साठी साइन अप करतात त्यांना 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. त्याच वेळी, जे लोक Amazon Pay गिफ्ट कार्ड खरेदी करतात त्यांना 10 टक्के सूट मिळेल. कंपनी इको, फायर टीव्ही, किंडल रेंज डिव्हायसेस आणि अलेक्सा स्मार्ट होम कॉम्बोवर अनेक डिल्स आणि ऑफर देणार आहे.यासोबतच ग्राहकांना फ्लाइट्सवर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. ग्राहकांना त्यांच्या चित्रपटाच्या तिकीट बुकिंगवर 25% पर्यंत सूट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT