Amazon Dine-in Esakal
विज्ञान-तंत्र

Amazon New Feature : अमेझॉनने सुरू केली Dine-in पेमेंट फीचरची चाचणी; झोमॅटो-स्विग्गीचं टेन्शन वाढलं!

अमेझॉनचा वापर करून रेस्टॉरंट्समध्ये पेमेंट केल्यास यूजर्सना डिस्काउंट देखील मिळणार आहे.

Sudesh

Amazon Dine-in Feature: अमेझॉन इंडिया सध्या आपल्या अ‍ॅपवरील यूजर एंगेजमेंट वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच कंपनीने एका नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे.

या फीचरच्या माध्यमातून ठराविक हॉटेलमध्ये यूजर्स अमेझॉन अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करू शकणार आहेत. बंगळुरूतील काही भागांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

टेक क्रंच या वेबसाईटने या फीचरबाबत माहिती दिली आहे. अमेझॉनचा वापर करून हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये पेमेंट केल्यास यूजर्सना डिस्काउंट देखील मिळणार आहे. यामुळे यूजर्स पेमेंटसाठी इतर अ‍ॅपऐवजी अमेझॉनचा वापर करतील, असा या योजनेचा उद्देश आहे.

झोमॅटो-स्विग्गीवर ऑफर्स

अशा प्रकारचे पेमेंट ऑप्शन्स झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही अ‍ॅप्समध्ये उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप केवळ फूड डिलिव्हरी न करता, हॉटेलमध्ये थेट पेमेंट करतानाही भरपूर ऑफर्स आपल्या यूजर्सना देतात. झोमॅटोने काही दिवसांपूर्वीच 'डायनिंग कार्निवल' ही ऑफर जाहीर केली होती.

या ऑफरच्या माध्यमातून गोल्ड यूजर्सना रेस्टॉरंट्समध्ये जागा बुक करता येत होती, तसंच एकूण बिलावर ५० टक्के डिस्काउंटही मिळत होता. यासोबतच स्विग्गीदेखील 'ग्रेट इंडियन रेस्टॉरंट फेस्टिवल'च्या माध्यमातून ठराविक रेस्टॉरंट्सच्या डाईन-इन बिलावर ५० टक्के डिस्काउंट देतं.

मात्र, आता अमेझॉन देखील या क्षेत्रात आल्यामुळे झोमॅटो-स्विग्गीला धोका निर्माण झाला आहे. अमेझॉन ही मोठी कंपनी असल्यामुळे देशभरातील बहुतांश रेस्टॉरंट्स त्यांच्यासोबत टायअप करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास स्विग्गी-झोमॅटोला याचा मोठा फटका बसू शकतो.

शॉपिंग झालं महाग

दरम्यान, अमेझॉनने काही दिवसांपूर्वीच आपल्या सेलर फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ३१ मे २०२३ पासून अमेझॉनवर ब्युटी प्रॉडक्ट्स, ग्रोसरी, औषधे, कपडे अशा प्रकारच्या गोष्टी विकण्यासाठी लागणारी फी वाढवण्यात आली आहे.

विक्रेते ही वाढलेली रक्कम ग्राहकांकडून वसूल करतील असा अंदाज आहे. त्यामुळेच, अमेझॉनवर शॉपिंग करणं आता महागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Cryptic Post: खरा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा...; विराटच्या पोस्टने सारे चक्रावले, गौतम गंभीरच्या 'त्या' सूचक इशाऱ्याला दिले उत्तर

Doctor Case : धक्कादायक! लग्नानंतर चार महिन्यांतच डॉक्टरने पत्नीला इंजेक्शन देऊन मारले ठार; दोघांत असं काय घडलं?

Veterinary Doctor: पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? जाणून घ्या अभ्यासक्रम अन् किती पगार मिळतो

Dhanteras 2025 Wishes In Marathi: धन धान्याची व्हावी घरीदारी रास..! धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक अन् मित्रमंडळींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

'यंदा गोविंदबागेत दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबीयांचा निर्णय'; काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्या काकी...'

SCROLL FOR NEXT