Amazon new Feature eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon : आता तुमच्या आवडीनुसार कस्टमाईज करता येणार वस्तू; अमेझॉनने लाँच केलं नवीन फीचर

कस्टमाईज युवर प्रॉडक्ट असं या फीचरचं नाव आहे.

Sudesh

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. कस्टमाईज युवर प्रॉडक्ट या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता आपल्या आवडीनुसार एखादी वस्तू तयार करून घेऊ शकणार आहेत.

अमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर ७६ विविध कॅटेगरींमधील १० हजारांहून अधिक प्रॉडक्ट्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. यामध्ये कस्टमर्सना व्हिजुअल डिझाईन टूल्स आणि रिअल-टाईम प्रॉडक्ट प्रिव्ह्यू असे पर्याय देखील देण्यात आले आहेत.

अमेझॉन इंडिया, कंझ्युमर बिझनेसचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की "नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या लोक एखादे प्रॉडक्ट खरेदी करताना कस्टमाईज्ड वस्तूंना प्राधान्य देतात. त्यामुळेच अमेझॉनने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे."

भविष्यात हा पर्याय आणखी प्रॉडक्ट्ससाठी लागू करण्याचा विचार सुरू आहे, असंही तिवारी यांनी सांगितलं. सध्या खिडक्यांचे पडदे, चादरी, होम डेकोरेशनच्या वस्तू, वॉल आर्ट, कपडे, फर्निचर, नाव कोरलेले पेन, नेकलेस, वॉटर बॉटल, ज्वेलरी ऑर्गनायजर, फोन कव्हर, नोटबुक अशा कित्येक प्रॉडक्ट्ससाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

या माध्यमातून तुम्ही एखादी वस्तू हव्या त्या रंगात, आकारात मागवू शकता. किंवा मग त्यावर नाव, तुम्हाला हवा असणारा मजकूर किंवा एखादा फोटो लावून घेऊ शकता. कस्टम प्रॉडक्ट शोधण्यासाठी तुम्हाला अमेझॉन वेबसाईटवर सर्च रिझल्टमध्ये असणाऱ्या 'पर्सनलाईज इट' या बटणावर क्लिक करायचं आहे. यानंतर 'कस्टमाईज नाऊ' हा पर्याय वापरून तुम्ही आपल्याला हवे ते बदल सुचवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT