Amazon Prime Air Drone esakal
विज्ञान-तंत्र

Prime Air Drone : घंटो का काम मिनिटों में! अमेझॉनचे ‘प्राईम एअर’ अवघ्या 60 मिनिटांत पोहोचणार वस्तु; कशी वापराल ही सुविधा? पाहा

Amazon Prime Air Drone : अमेझॉनने ‘प्राईम एअर’ नावाची ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू केली असून, आयफोनसारखी गॅजेट्स आता अवघ्या एका तासात मिळणार आहेत.

Saisimran Ghashi

Amazon Prime Air Drone Service : अमेझॉनने जगातल्या ई-कॉमर्स क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. आता तुम्हाला आयफोन, एअरपॉड्स, स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स अवघ्या ६० मिनिटांत घरी मिळणार आहेत तेही ड्रोनच्या माध्यमातून! कंपनीने आपल्या Prime Air या अत्याधुनिक ड्रोन डिलिव्हरी सेवेची सुरुवात सध्या अमेरिकेतील काही निवडक शहरांमध्ये केली आहे. तसेच भारतात ही सुविधा लवकरच सुरू होईल

आयफोन अवघ्या १० मिनिटांत

टेक्सास आणि ऍरिझोना या शहरांमध्ये ग्राहकांना आता आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी, एअरटॅग्स, स्मार्ट रिंग्ज, व्हिडिओ डोअरबेल्स यांसारखी उत्पादने ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या १० ते ६० मिनिटांत मिळू शकतात. ही सेवा अमेझॉनच्या MK30 या नव्या प्रकारच्या ड्रोनवर आधारित आहे, जी वजनाने २ किलोपर्यंतची उत्पादने ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवू शकते.

कशी काम करते ही ड्रोन सेवा?

या ड्रोनमध्ये अतिशय प्रगत सेन्सर आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञान वापरले आहे. यापूर्वी QR कोडद्वारे डिलिव्हरी स्पॉट ओळखले जात होते. पण MK30 ड्रोन स्वतःच आजूबाजूचं निरीक्षण करून सुरक्षित जागा निवडते, उंचीवरून (सुमारे १३ फूट) पॅकेज हलक्या पद्धतीने खाली सोडते

हवामानाचा अचूक अंदाज

अमेझॉनने या सेवेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हवामानाचा ७५ मिनिटांचा अचूक अंदाज देणारी प्रणाली वापरली आहे. खराब हवामान असल्यास ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाते आणि डिलिव्हरी पुढे ढकलली जाते.

६० हजारपेक्षा अधिक उत्पादने ड्रोनने मिळणार

हे फक्त फोनपुरतं मर्यादित नाही. अमेझॉनने २ किलोहून कमी वजन असलेली ६० हजारहून अधिक उत्पादने या सेवेच्या अंतर्गत आणली आहेत. यामध्ये किचन गॅजेट्स, फिटनेस उपकरणे, स्मार्ट उपकरणे यांचा समावेश आहे.

सध्या ही सेवा अमेरिकेतील काही निवडक शहरांमध्येच सुरू आहे. पण ई-कॉमर्समध्ये स्पर्धा वाढत चालल्यामुळे अशा अत्याधुनिक सेवा लवकरच भारतातही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय ग्राहकांसाठी हे महत्वाचे ठरू शकते जिथे आयफोनसारखी महागड्या वस्तू डिलिव्हरीसाठी दिवसांचा नाही, तर मिनिटांचा विचार केला जाईल.
अमेझॉनची Prime Air सेवा हे ई-कॉमर्सच्या भविष्यातील दृश्य दाखवत आहे जिथे स्मार्ट तंत्रज्ञान, ड्रोन आणि अचूक लॉजिस्टिक्स यामुळे ग्राहकाला मिळणार आहे जलद, सुरक्षित आणि आकर्षक डिलिव्हरी अनुभव. भारतातही ही सेवा येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

Latest Marathi News Live Update : 'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

योगिता सौरभपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा संसार मोडणार? नवऱ्यापासून राहतेय वेगळी; एकमेकांना अनफॉलोही केलं...

Dhule News : दिवाळीनंतर एसटीचा 'सुपरफास्ट' विक्रम! धुळे विभागातून पुणे-मुंबईसाठी एकाच दिवसात १०९ जादा बस रवाना

SCROLL FOR NEXT