Amazon Prime Video subscription price hike esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Prime Video वापरकर्त्यांना झटका! सबस्क्रिप्शन प्लॅन महागणार, OTT बजेट वाढणारे नवे दर लगेचच पाहा

Amazon Prime Video आता जाहिरातीशिवाय पाहण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणार आहे.

Saisimran Ghashi

Amazon Prime Video subscription price hike : जगातील एक प्रमुख ओटीटी सेवा पुरवणारी कंपनी Amazon Prime Video लवकरच भारतात आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती वाढवणार आहे. वेब सिरीज, चित्रपट आणि विविध कार्यक्रम पाहण्याचा खर्च जूनपासून वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. १७ जून २०२५ पासून Prime Video वर जाहिराती सुरू होणार असून, जाहिरातीविना अनुभव हवा असल्यास वापरकर्त्यांना अतिरिक्त अ‍ॅड-ऑन प्लॅन घेणे बंधनकारक असेल.

‘अ‍ॅड-फ्री’ अनुभवासाठी वाढीव शुल्क

Amazon Prime चे विद्यमान ग्राहक, ज्यांना जाहिरातीशिवाय कंटेंट पाहायचा आहे त्यांनी आता नवीन अ‍ॅड-फ्री अ‍ॅड-ऑनसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हे अ‍ॅड-ऑन दरवर्षी 699 रुपये किंवा मासिक 129 रुपये इतके असणार आहे. याचा अर्थ ग्राहकांनी मूळ सबस्क्रिप्शन व्यतिरिक्तही खर्च करावा लागेल.

सध्याचे प्लॅन्स आणि नवीन किंमती

भारतामध्ये सध्या Prime चे तीन प्लॅन्स उपलब्ध आहेत.

  1. Prime Shopping Edition (399रुपये/वर्ष): यात Prime Video समाविष्ट नाही.

  2. Prime Lite (799रुपये/वर्ष): Prime Video मिळते, पण केवळ 720p क्वालिटी.

  3. Standard Prime (1499रुपये/वर्ष): HD व्हिडिओ क्वालिटी आणि इतर सर्व फायदे.

जाहिरातीविना कंटेंटचा अनुभव हवा असल्यास प्रत्येक योजनेवर 699 रुयये वार्षिक किंवा 129 रुयये मासिक अ‍ॅड-ऑन भरावा लागणार आहे. यामुळे नवीन दर पुढीलप्रमाणे असतील.

  • Prime Shopping Edition या योजनेची वार्षिक किंमत 399 रुयये असून, यामध्ये कोणताही अ‍ॅड-ऑन चार्ज लागणार नाही. त्यामुळे एकूण किंमत 399 रुयये इतकीच राहील.

  • Prime Lite योजनेची मूळ वार्षिक किंमत 799 रुयये आहे. जाहिरातमुक्त अनुभवासाठी 699 रुययेचा अ‍ॅड-ऑन चार्ज भरावा लागेल, त्यामुळे एकूण खर्च 1498 रुयये होईल.

  • Standard Prime च्या 12 महिन्यांच्या योजनेसाठी मूळ किंमत 1499 रुयये असून, त्यावर 699 रुययेचा अ‍ॅड-ऑन लागू होईल. यामुळे एकूण किंमत 2198 रुययेपर्यंत जाईल.

  • Standard Prime चा 1 महिन्याचा प्लॅन 299 रुययेमध्ये मिळतो. त्यावर 129 रुययेचा मासिक अ‍ॅड-ऑन जोडल्यास एकूण खर्च 428 रुयये होईल.

  • Standard Prime चा 3 महिन्यांचा प्लॅन 599 रुययेचा आहे, परंतु अ‍ॅड-ऑन 699 रुयये वार्षिक स्वरूपात लागू होईल, त्यामुळे एकूण खर्च 1298 रुयये होईल.

एकाच वेळी फक्त दोन डिव्हाइसेसवर स्ट्रीमिंग

या बदलांव्यतिरिक्त Prime Video ने एक मोठा निर्बंध आणला आहे. आता ग्राहक एकाच वेळी फक्त दोन डिव्हाइसेसवर Prime Video पाहू शकतात. पूर्वी ही मर्यादा १० डिव्हाइसेस होती.

Amazon Prime चे इतर फायदे जसे की एकदिवसीय डिलिव्हरी, Prime Music आणि Prime Reading पूर्वीप्रमाणे कायम राहतील, परंतु जाहिरातविरहित मनोरंजनासाठीचा खर्च निश्चितच वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT