Amazon Fake Prasad eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Fake Prasad : अमेझॉनवर सुरू होती श्रीराम मंदिराच्या नकली प्रसादाची विक्री; CCPA च्या नोटीसनंतर झाली कारवाई!

अमेझॉन किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवरुन आपण प्रसादाची विक्री करत नसल्याचं अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

Sudesh

Fake Prasad of Ayodhya Ram Mandir on Amazon : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आतुरता जगभरातील श्रीराम भक्तांना लागून आहे. एकीकडे संपूर्ण देश या भव्य सोहळ्यासाठी सज्ज झालेला असतानाच, राम मंदिराच्या नावावर फसवणूकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला होता.

"अयोध्येतील राम मंदिरातील प्रसाद" अशा नावाने अमेझॉनवर मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री सुरू होती. अमेझॉन किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवरुन आपण प्रसादाची विक्री करत नसल्याचं अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सेंट्रल कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने (CCPA) याबाबत अमेझॉनला नोटीस जारी केली होती.

यानंतर आता अमेझॉनने अशा प्रकारची उत्पादने आपल्या वेबसाईटवरुन हटवली आहेत. तसंच, अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई देखील करण्यास अमेझॉनने सुरुवात केली आहे. अशा प्रकारची दिशाभूल करणारी उत्पादने आता अमेझॉनवर दिसणार नाहीत असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

इतर प्रकारे फसवणूक सुरू

राम मंदिराच्या नावाने आणखीही बऱ्याच प्रकारचे स्कॅम सध्या सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा व्हीआयपी पास मिळवण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करा, अशा प्रकारचा मेसेजही व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर इन्स्टॉल करुन, फोन हॅक होऊ शकतो.

क्यूआर कोड स्कॅम

यासोबतच, कित्येक नागरिकांना राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावाने क्यूआर कोड पाठवून, पैसे दान करण्यास सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचं कोणतंही डोनेशन अभियान आपण राबवत नसल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT