OnePlus 10T
OnePlus 10T Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: OnePlus चा महागडा फोन मिळतोय स्वस्तात, फीचर्स अफलातून; जाणून घ्या ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Discount on OnePlus 10T: नववर्षाच्या निमित्ताने जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर OnePlus 10T स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Amazon वर सध्या फॅब फोन फेस्ट सेल सुरू आहे. सेलमध्ये Redmi Note 11 Pro+ आणि OnePlus 10 Pro ला देखील स्वस्तात खरेदी करता येईल.

Amazon सेलमध्ये OnePlus 10T स्मार्टफोन ४४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. सेलमध्ये फोनवर ५ हजार रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. ही किंमत डिव्हाइसच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची आहे.

फोनवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. यावर १५०० रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळेल. याशिवाय, १३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास OnePlus 10T स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदी करता येईल. या ऑफरचा फायदा ३१ डिसेंबरपर्यंत मिळेल.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

OnePlus 10T स्मार्टफोनचे फीचर्स

५जी फोन खरेदी करायचा असल्यास OnePlus 10T चांगला पर्याय आहे. फोन स्नॅपड्रॅगन ८ प्लस झेन १ चिपसेटसह येतो. यामध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी १५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४८०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये फोनची बॅटरी ८-९ तास सहज टिकते.

फोनवर कंपनी ३ वर्ष अँड्राइड ओएस अपग्रेड आणि ४ वर्षांपर्यंत सिक्योरिटी पॅच मिळेल. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, इतरही शानदार फीचर्स मिळतील.

हेही वाचा: Samsung Laptop: 5G सपोर्टसह आला Samsung चा भन्नाट लॅपटॉप, फीचर्स खूपच जबरदस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT