Amazon Car Shopping eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Car Shopping : आता घरबसल्या ऑर्डर करता येणार कार; अमेझॉनवर सुरू होणार विक्री! जाणून घ्या सविस्तर

अमेझॉन कंपनी पुढील वर्षापासून ही सेवा सुरू करणार आहे.

Sudesh

Order Car on Amazon : आजकाल ई-कॉमर्स वेबसाईटमुळे ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. लोक कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर यासोबतच अगदी दूध, भाज्या अशा गोष्टी देखील ऑनलाईन मागवू शकतात. मात्र आता तुम्ही चक्क कार देखील ऑनलाईन मागवू शकणार आहात. अमेझॉन कंपनी पुढील वर्षापासून ही सेवा सुरू करणार आहे. यासाठी अमेझॉनने ह्युंडाई कंपनीसोबत करार केला आहे.

कंपनीने सांगितलं, की ही सेवा सध्या केवळ अमेरिकेत सुरू करण्यात येणार आहे. अमेझॉनवर सध्या केवळ कार पार्ट्स विकत मिळतात. तसंच, अमेझॉन व्हेईकल शोरुममध्ये गाड्यांच्या जाहिराती देता येतात. मात्र, लवकरच थेट कार ऑर्डर करण्याची सुविधा देखील अमेझॉन देणार आहे.

ह्युंडाई-अमेझॉनची पार्टनरशिप

कोरियन वाहन निर्माती कंपनी ह्युंडाई आणि अमेझॉनने यावेळी आणखी एक घोषणा केली. या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानंतर आता ह्युंडाईच्या गाड्यांमध्ये अ‍ॅलेक्साचा सपोर्ट मिळणार आहे. भविष्यातील आपल्या गाड्यांमध्ये हे फीचर कंपनी देणार आहे.

फ्लिपकार्टवर मिळतात ई-बाईक

फ्लिपकार्टवर आधीपासूनच ई-बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अगदी भारतात देखील तुम्ही कित्येक कंपन्यांच्या ई-बाईक्स ऑनलाईन मागवू शकता. (Tech News)

फेसबुकवर अमेझॉन शॉपिंग

अमेझॉनने फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत देखील पार्टनरशिप केली आहे. यामुळे आता फेसबुक-इन्स्टावरुन थेट अमेझॉन शॉपिंग करता येणार आहे. यासाठी तुम्हाला अमेझॉनच्या अ‍ॅपवर जाण्याची गरज भासणार नाही. लवकरच हे फीचरही लाँच करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT