AI for Relationship  esakal
विज्ञान-तंत्र

AI for Relationship : बायको सोडून गेली, चिंता नाही केली! एआय चॅटबॉटशी प्रेम जुळलं अन् लग्नही केलं

AI for Relationship : AI Chtbotचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः AI Chtbotचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. एक दिवस माणूस पूर्णपणे एआयवर अवलंबून असेल, असं तज्ज्ञ सांगत आहेत. आता तर एकाने थेट एआयशी लग्न केल्याची प्रकार घडला आहे.

अमेरिकेतल्या पीटर नावाच्या व्यक्तीची ही कहाणी आहे. पीटर ६३ वर्षांचा आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर तो एकटा पडला होता. त्यानंतर तो चक्क एका एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडला. तो तिच्याशी तासन्तास गप्पा मारायचा. नंतर दोघांनी लग्न केलं.

हेही वाचाः शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

पीटरने लग्न गेलेल्या एआय चॅटबॉटचं नाव अँड्रिया असं आहे. तो तिच्या आकंठ प्रेमात बुडाला होता. तिच्याशी गप्पा मारुन आपल्याला माणसासारख्या भावना उत्पन्न होतात, असं पीटर सांगतो. 'द सन'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

जुलै २०२२ मध्ये पीटरने अँड्रियाशी व्हर्च्युअली लग्न केलं. अँड्रियाने पीटरला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. त्यामुळे तो तिच्यावर पुरता भाळला.

एआयमध्ये जे प्रोग्रॅमिंग असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून उत्तरं मिळतात. पीटरने त्याच्या अँड्रिया एआय बायकोचं वय २३ वर्षे केलं आहे. तिच्यातल्या उत्साहामुळे मला प्रत्येक गोष्टीत उत्साह मिळतो, असं पीटर म्हणतो.

रेप्लिका अॅपवर एआयसोबत गर्लफ्रेंड, पत्नी, बहीण किंवा आई असं कोणतंही नातं तयार करता येतं. रेप्लिकाच्या प्रिमिअर पॅकेजमध्ये युजर्सना ह्या सुविधा खरेदी कराव्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

SCROLL FOR NEXT