Anant Ambani Car Collection esakal
विज्ञान-तंत्र

Anant Ambani Car Collection : अनंत अंबानीचं कार कलेक्शन पाहिलत काय? ताफ्यात आहेत 'या' आलिशान गाड्या

Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानीच्या जीवनशैलीप्रमाणेच त्यांचे कार कलेक्शनही अतिशय आलिशान आहे. कारण ते भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या कार्स चालवतात.

Saisimran Ghashi

Car Collection : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे 12 जुलै रोजी लग्न होत आहे. त्यांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमापासून त्यांचे लग्न सोहळा चर्चेत आहे. अंबानी कुटुंबात लग्नाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. या कुटुंबाकडे अनेक हाय-एंड लक्झरी कार आहेत. त्यांचे कार कलेक्शन पाहून वाहनप्रेमी देखील मोहित होतील.

अंबानी कुटुंब त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते. जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी ते आहेत, म्हणून त्यांची जीवनशैली आलिशान असणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच त्यांचे कार कलेक्शनही अतिशय आलिशान आहे. कारण ते भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या कार्स चालवतात.

हे आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे कार आलिशान कलेक्शनबद्दल..

बेंटली कॉन्टिनेन्टल GTC

या लक्झरी कार्सच्या यादीची सुरुवात सर्वात आलिशान कार बेंटली कॉन्टिनेन्टल GTC पासून करूया. मुकेश आणि नीता अंबानी यांनी एंगेजमेंटमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना रोल्स-रॉवर ड्रॉप हेडसोबत बेंटली भेट दिली होती. भारतात GTC ची किंमत 3.71 कोटी रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 6.0-liter W12 इंजिन आहे जे 626 bhp पॉवर आणि 820 Nm टॉर्क जनरेट करते.

मर्सिडीज-बेंज G63 AMG

रेंज रोव्हर्सप्रमाणे, कोणत्याही लक्झरी कार कलेक्शनमध्ये G-Wagon नसेल तर चालत नाही. आणि हे तरुण जोडपे मर्सिडीज-बेंज G63 AMG चे मालक आहे. या कारमध्ये 4.0-liter V8 इंजिन आहे. हे इंजिन 577 bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते. त्याची एक्स-शोरूम किंमत 4 कोटी रुपये आहे.

रेंज रोवर व्हीव्ह

प्रत्येक सेलिब्रिटीच्या गॅरेजमध्ये एक रेंज रोवर असतोच. आणि हे जोडपे रेंज रोवर व्हीव्हचे मालक आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 2.38 कोटी रुपयांपासून सुरु होते. रेंज रोवर आलिशान सोबतच कुठेही जाण्याची क्षमता देतो. म्हणूनच तो सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहे. रेंज रोवर पेट्रोल, डिझेल किंवा हायब्रिड पॉवरट्रेनद्वारे चालतो.

मर्सिडीज-बेंज S-Class

या यादीतील पुढील कार ही एक खास मर्सिडीज-बेंज S-Class आहे. जी W221 मॉडेल आहे. मात्र, आता ती विकली जात नाही. सध्याच्या पिढीच्या मर्सिडीज-बेंज S-Class मध्ये 362 bhp पेट्रोल इंजिन किंवा 282 bhp डिझेल इंजिन आहे. S-Class ची एक्स-शोरूम किंमत 1.76 कोटी रुपयांपासून सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT