Apple Products esakal
विज्ञान-तंत्र

Apple Products च्या किंमतीत वाढ! युजर्सला मोठा फटका...एवढ्या हजारांनी किंमतीत वाढ

Apple ने अलीकडेच काही उत्पादने आणि अॅक्सेसरीजच्या किमतीतही वाढ केली आहे

सकाळ डिजिटल टीम

Apple ने अलीकडेच iPad चे नवीन मॉडेल 10.9 इंच iPad आणि iPad Pro ची घोषणा केली. आयपॅडचे लाँचिंग झाल्यानंतर लगेचच अॅपलने इतर काही आयपॅड मॉडेल्सच्या किमती वाढवल्यात. इतकेच नाही तर Apple ने अलीकडेच काही उत्पादने आणि अॅक्सेसरीजच्या किमतीतही वाढ केली आहे. जवळजवळ प्रत्येक Apple वॉच बँडची किंमत आता जास्त आहे. जाणून घेऊयात नवे दर.

Apple iPad mini: अॅप्पल हा सर्वात मीनी आयपॅड असून जेव्हा हे आयपॅड लाँच झालं तेव्हा त्याची किंमत 46,900 एवढी होती आता ती 49900 एवढी झाली आहे. तब्बल तीन हजारांची वाढ कंपनीने केली आहे.

Apple iPad Air: याचवर्षी अॅप्पलने आयपॅड एअर MI चिपसह लाँच केलं. याची सुरूवाती किंमत 54900 एवढी होती. अॅप्पलच्या या प्रोडक्टमध्ये तब्बल पाच हजारांची वाढ झाली आहे. आता याचीच किंमत आता 59900 एवढी आहे. (Company)

Apple iPad (9th-gen): या प्रोडक्टच्या दरातही वाढ झाली असून आता याची किंमत कंपनीने 33900 एवढी केली आहे.

iPhone SE (2022): iPhone च्या या प्रोडक्टमध्ये तब्बल सहा हजारांची वाढ दिसून आली. याची आताची किंमत 64,900 एवढी आहे.

Apple AirTag: अॅप्पलच्या एअर टॅगच्या किंमतीत देखील लक्षणीय वाढ दिसून आली. हे टॅग 300 रूपयांनी महागलं असून आता त्याची किंमत 3490 एवढी करण्यात आली आहे. या सगळ्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता चार एअर टॅगचा पॅक बॉक्सही हजार रुपयांनी वाढला आहे. आता या पॅकची रिसेंट किंमत 11900 रुपये एवढी झाली आहे.

Apple Watch Braided Loop Band: या प्रोडक्टची किंमत सोळाशे रुपयांनी वाढली असून आता याची रिसेंट किंमत 9500 झाली आहे.

Apple Watch Sport and Sport Loop bands: या प्रोडक्टची सुरूवाती किंमत 3900 होती आता 4500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT