अॅपलने आपल्या वार्षिक WWDC 2025 (Worldwide Developers Conference) मध्ये iOS 26 चे अधिकृत अनावरण केले असून, हे नवे अपडेट iPhone वापरकर्त्यांसाठी अनेक मोठे बदल घेऊन आला आहे. नवीन ‘Liquid Glass’ डिझाइनपासून ते स्मार्ट ऑन डिव्हाईस AI, भाषांतर, इमोजी आणि अपग्रेड केलेले कोअर अॅप्स iOS 26 वापरकर्त्यांच्या अनुभवाला नवी दिशा देणार आहे.
iOS 26 मध्ये Apple ने पहिल्यांदाच Liquid Glass नावाची डिझाइन भाषा सादर केली आहे. हे इंटरफेस जे अॅप्स, विडजेट्स आणि आयकॉन्सना अधिक आधुनिक, स्वच्छ आणि जिवंत लुक देते. स्क्रिनवरील महत्त्वाच्या गोष्टी अधिक उठून दिसतील, असा यामागचा उद्देश आहे.
नवीन लॉकस्क्रिन आता आपल्या वॉलपेपरनुसार आपोआप बदलतो, ज्यामुळे मजकूर वाचायला अधिक सोपा होतो. याशिवाय, होमस्क्रिनवर आयकॉन्स व विडजेट्सना पारदर्शक इफेक्ट देऊन प्रीमियम लुक देता येतो.
Apple Intelligence आता Live Translation या फिचरसह अधिक स्मार्ट झाले आहे. Messages, FaceTime आणि Phone अॅपमध्ये प्रत्यक्ष संवाद चालू असताना भाषांतर करता येते, तेही पूर्णतः ऑन-डिव्हाईस त्यामुळे गोपनीयता अबाधित राहते.
iPhone आता स्क्रीनवरील मजकुरातील तारीखा, ठिकाणं, प्रॉडक्ट्स ओळखतो आणि त्यानुसार कॅलेंडरमध्ये एंट्री करणे किंवा वेब सर्च करणे यासारख्या सूचना देतो. हा AI आधारित स्मार्टनेस अनुभवाला नवे वळण देतो.
वापरकर्ते आता स्वतःचे Genmoji तयार करू शकतात मजकुराच्या आधारे इमोजी निर्माण करणे शक्य झाले आहे. Image Playground ही नवीन AI टूल वापरून वापरकर्ते पर्सनल किंवा सोशल प्रोजेक्टसाठी सुंदर चित्रनिर्मिती करू शकतात.
फोन अॅप आता अधिक संयोजित स्वरूपात Favourites, Recents आणि Voicemail एकाच विंडोमध्ये. Call Screening नावाचे नवीन फिचर अनोळखी कॉल्सचे थेट ट्रान्स्क्रिप्शन करते. Hold Assist ग्राहक सेवा कॉल्ससाठी प्रतीक्षा संपल्यावर सूचना देते.
Messages अॅप आता अनोळखी मेसेज पाठवणाऱ्यांसाठी वेगळी फोल्डर ठेवतो. ग्रुप चॅट्समध्ये polls तयार करता येते. प्रत्येक संभाषणासाठी वेगळे वॉलपेपर ठेवल्यामुळे अनुभव अधिक खास होतो.
CarPlay मध्ये आता कॉल बॅनर अधिक कॉम्पॅक्ट आहेत. याशिवाय विडजेट्स, Live Activities, Tapbacks आणि पिन केलेले चॅट्स यांचा समावेश आहे, जे वाहन चालवताना अडथळा न आणता संवाद शक्य करतात.
Apple Music मध्ये आता Lyrics Translation फिचर असून, AutoMix चा वापर करून गाण्यांचे ट्रान्झिशन अधिक सुंदर बनवले जात आहेत. Maps अॅप आता वापरकर्त्याने पूर्वी गेलेली ठिकाणं लक्षात ठेवतो आणि रोजच्या मार्गांबाबत सूचना देतो.
Apple Games नावाचे नवे अॅप सर्व गेम्स विशेषतः Apple Arcade एका ठिकाणी संग्रहित करते, ज्यामुळे गेम मॅनेज करणे अधिक सोपे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.