Apple iPhone 15 Sakal
विज्ञान-तंत्र

Apple iPhone 15: लाँचआधीच iPhone 15 चे फीचर्स लीक, किंमतीचाही खुलासा; पाहा संपूर्ण डिटेल्स

लाँचआधीच अपकमिंग आयफोन १५ प्लसची फीचर्स आणि किंमत समोर आली आहे. या फोनची किंमत आयफोन १४ पेक्षा कमी असू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Apple iPhone 15 Features Leaked: नवीन आयफोन सीरिजची प्रत्येकजण वाट पाहत असतो. Apple देखील दरवर्षी नवीन मॉडेलला सादर करते. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच iPhone 14 सीरिजला लाँच केले होते. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 plus, iPhone 14 pro, iPhone 14 pro max चा समावेश आहे. मात्र, आतापासूनच आयफोन १५ ची चर्चा सुरू झाली आहे.

रिपोर्टनुसार, iPhone 14 Plus च्या जास्त किंमतीमुळे या सीरिजला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनी iPhone 15 Plus ला कमी किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. Apple iPhone 15 सीरिजच्या प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलबाबत गंभीरतेने विचार करत आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी कंपनी iPhone 15 Plus मॉडेलला अवघ्या ८९९ डॉलर्स (जवळपास ७५ हजार रुपये) सुरुवाती किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, लाँचनंतरच फोनची अधिकृत किंमत समजू शकेल.

हेही वाचा: Airtel Offer: एअरटेल यूजर्सला मोफत देत आहे तब्बल 50GB डेटा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

कंपनी iPhone 15 Plus ला सीरिजमधील बेसिक मॉडेल म्हणून सादर करू शकते. Apple ने गेल्याकाही वर्षात आयफोनच्या लाइनअपमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, मागील काही सीरिजचे डिझाइन सारखे असल्याने कंपनीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

iPhone 15 Plus चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Apple लवकरच iPhone 15 सीरिजला लाँच करण्याची शक्यता आहे. या सीरिजच्या फोन्समध्ये डायनॅमिक आयलँड आणि हाय-रिफ्रेश रेट प्रोमोशन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी फोनमध्ये सॅमसंग आणि एलजीच्या LTPO पॅनेलचा वापर करेल. सर्वसाधारणपणे Apple द्वारे आयफोनमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जातो.

दरम्यान, कंपनीने यावर्षी iPhone 14 Plus ला सादर केले आहे. फोनमध्ये ६.७ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोन ४ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT