iPhone 15 Heating eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Heating : 'आयफोन 15'चे प्रो मॉडेल्स होतायत ओव्हरहीट; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

iPhone 15 Overheating : हे फोन चार्जिंग करताना एवढे गरम होत आहेत, की ते हातातही घेता येत नाहीयेत अशी तक्रार यूजर्सनी केली आहे.

Sudesh

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपली नवी आयफोन 15 सीरीज लाँच केली आहे. हे आयफोन आता यूजर्सना डिलिव्हर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, या सीरीजमधील प्रो मॉडेल्स ओव्हरहीट होत असल्याची तक्रार यूजर्सनी केली आहे.

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे फोन चार्जिंग करताना एवढे गरम होत आहेत, की ते हातातही घेता येत नाहीयेत अशी तक्रार यूजर्सनी केली आहे. एवढंच नाही, तर गेमिंग आणि फोन कॉल करतानाही हे फोन गरम होत असल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे.

ब्लूमबर्गने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कित्येक यूजर्सना नवीन डिव्हाईस सेटअप करताना, नवीन अ‍ॅप्स डाऊनलोड करताना, iCloud वरुन फोटो किंवा डेटा डाऊनलोड करताना आणि सोशल मीडिया ब्राऊज करताना देखील आयफोन गरम होत असल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे. काही यूजर्स तर आपल्या आयफोनला थर्मामीटर लावून त्याचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत आहेत.

नवीन चिपमुळे हीटिंग?

हा प्रॉब्लेम अ‍ॅपलच्या नव्या A17 चिपमुळे होत असल्याचं काही यूजर्सचं म्हणणं आहे. मात्र, असं काही नसल्याचं अ‍ॅपल अ‍ॅनालिस्ट मिंग ची कुओ यांनी स्पष्ट केलं आहे. मीडियम या वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयफोनमधील हीटिंग इश्यू थर्मल सिस्टीमच्या डिझाईनमध्ये असलेल्या त्रुटीमुळे होत असल्याचं कुओ म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

GeoSpy AI: नवीन एआय! फोटो कुठे काढला, त्याची माहिती देणार! गोपनियतेबद्दल जगभरातून शंका

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

SCROLL FOR NEXT