apple iphone se 4 may launch with iphone xr design with larger display specification launch date  
विज्ञान-तंत्र

Apple iPhone SE 4: Apple च्या स्वस्त आयफोनबद्दल समोर आली माहिती, मिळणार 'हे' फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Apple ने नुकतीच आपली नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. आता Apple च्या नवीन आगामी iPhone Apple iPhone SE 4 बद्दल अनेक लीक्स समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की Apple हा फोन 2023 च्या सुरुवातीला लॉन्च करू शकते. एवढेच नाही तर फोनच्या फीचर्सबाबतही अनेक लीक्स समोर येत आहेत.

iPhone SE 4 चे संभाव्य डिझाइन

टिपस्टर Jon Prosserच्या मते, iPhone SE 4 iPhone XR च्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह सादर केला जाईल. मात्र, नवीन आयफोनचा डिस्प्ले आयफोन XR पेक्षा मोठा ठेवला जाईल. iPhone SE 4 ला 6.1-इंचाची LCD स्क्रीन मिळेल, जी टॉप नॉच कटआउटसह येईल. असे झाले तर SE मालिकेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रीन ठरणार आहे.

आतापर्यंत, SE सिरीज लहान आकाराच्या डिस्प्लेसह ऑफर केली गेली आहे. डिझाईनबाबत, स्मार्टफोन कमी बेझल, नॉच आणि स्लिम डिझाइनमध्ये सादर केला जाईल, असा दावाही केला जात आहे. यामध्ये फेस आयडीही दिला जाऊ शकतो. Apple ने अद्याप iPhone SE 4 बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. वास्तविक, नवीन iPhone iPhone SE (2022) च्या सक्सेसरच्या रुपात लॉन्च केला जाईल. हा फोन मिडनाईट, स्टार लाइट आणि रेड कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

iPhone SE 4 ची संभाव्य फीचर्स

लीक्सनुसार, iPhone SE 4 iPhone XR च्या फीचर्ससह लॉन्च केला जाऊ शकतो, जो कंपनीने 2018 मध्ये सादर केला होता. आयफोन SE 4 हा Apple च्या साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला पहिला हँडसेट देखील असू शकतो. Apple A15 किंवा A16 बायोनिक चिपसेट नवीन आयफोनमध्ये मिळू शकतात. फोनमध्ये LED फ्लॅशसह सिंगल कॅमेरा मिळेल.

iPhone SE 3 (2024)

Apple ने आपला SE सीरीज फोन iPhone SE 3 या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. वास्तविक, SE सिरीज Apple कडून येणारी बजेट फोन सिरीज आहे आणि तिचा आकार कॉम्पॅक्ट ठेवला आहे. मात्र, यावेळी त्यात बदल पाहायला मिळू शकतो. iPhone SE 3 तीन स्टोरेज प्रकारांमध्ये (64 GB, 128 GB आणि 256 GB स्टोरेज) लाँच करण्यात आला आणि त्याची किंमत 43,900 रुपयांपासून सुरू होते. iPhone SE 3 Apple A15 Bionic प्रोसेसर आणि 4.7-इंचाच्या रेटिना डिस्प्लेसह सादर करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT