Apple M3 Chip eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Scary Fast Event : अ‍ॅपलने लाँच केले नवीन MacBook Pro आणि iMac; काय आहेत अपग्रेडेड फीचर्स?

Apple M3 Chip : अ‍ॅपलने आपली नवीन M3 चिप लाँच केली आहे.

Sudesh

अ‍ॅपलचा स्केरी फास्ट इव्हेंट आज पहाटे पार पडला. यावेळी कंपनीने नवीन M3 चिपसेट असलेले MacBook Pro आणि iMac लाँच केले. अ‍ॅपलचा हा इव्हेंट कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या हेडक्वार्टर्समध्ये आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावर्षी आयमॅकला 25 वर्षे पूर्ण होत आहेत.

कशी आहे M3 चिप?

अ‍ॅपलने आपली नवीन M3 चिप लाँच केली आहे. यामध्ये M3, M3 Pro आणि M3 Max असे तीन व्हर्जन आहेत. या नव्या चिप्स M1 चिपच्या तुलनेत 50 पटींनी आणि M2 चिपच्या तुलनेत 30 पटींनी वेगवान आहेत. इंटेल चिपच्या तुलनेत M3 Max ही चिप तब्बल 11 पटींनी वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नवीन MacBook Pro

अ‍ॅपलने MacBook Pro चे दोन नवीन व्हेरियंट लाँच केले आहेत. यामध्ये नवीन कलर ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसंच, मॅजिक कीबोर्ड, मॅजिक ट्रॅकपॅड आणि मॅजिक माऊस असे फीचर्स यासोबत दिले आहेत. यामध्ये यूएसबी सी पोर्ट देण्यात आलेला नाही.

नवीन मॅकबुक प्रो तब्बल 22 तासांचा बॅटरी बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामधील 14 इंच MacBook Pro ची किंमत 1,599 डॉलर्स आहे, तर 16 इंच स्क्रीनच्या मॅकबुक प्रोची किंमत 1,999 डॉलर्स एवढी आहे.

नवीन iMac

अ‍ॅपलने आज 24 इंच मोठ्या स्क्रीनचा iMac कम्प्युटर देखील लाँच केला. यामध्ये 4.5K रेटिना डिस्प्ले, 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज असे फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन iMac ची किंमत 1,299 डॉलर्स एवढी असणार आहे. याची प्री-बुकिंग आजपासूनच सुरू झाली आहे. तसंच, याची डिलिव्हरी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारासह निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सचा छापा, १० कोटींची रोकड जप्त; वऱ्हाडी बनून पोहोचले अधिकारी

ACB चा मोठा दणका! पोलिस उपनिरीक्षकासह मुख्याध्यापकाचा 'काळा' कारनामा कॅमेऱ्यात कैद; एकाने मागितले 50 तर दुसऱ्याने मगितली 25 हजारांची लाच!

Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : फी न भरल्याने विद्यार्थिनीला काढणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Kidney Racket: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी; आरोपींची संपत्ती गोठविणार, गृहराज्यमंत्री भोयर

SCROLL FOR NEXT