Apple MacBook Air eSakal
विज्ञान-तंत्र

Apple MacBook Air : अ‍ॅपलने लाँच केला मॅकबुक एअर M3 अन् M2 मॉडेल झालं स्वस्त.. किती आहे किंमत?

MacBook Air M3 : अ‍ॅपलचे हे नवीन मॅकबुक एअर 6 मार्चपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध होतील. अ‍ॅपल स्टोअरमधून HDFC बँकेच्या कार्डने याची खरेदी केल्यास, तब्बल 8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

Sudesh

Apple MacBook Air M3 Launched : अ‍ॅपलने भारतात M3 चिपसेट असणारा नवा मॅकबुक एअर लॅपटॉप लाँच केला आहे. यानंतर M2 चिपसेट असणाऱ्या मॅकबुकची किंमत अगदी कमी झाली आहे. जुन्या मॅकबुक एअर M2 वर आता तब्बल 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

MacBook Air M3

अ‍ॅपलने आपल्या नव्या मॅकबुक एअरचे दोन मॉडेल लाँच केले आहेत. 13 इंच स्क्रीन आणि 15 इंच स्क्रीन असणारे हे दोन मॉडेल आहेत. 13 इंच स्क्रीनच्या M3 मॅकबुक एअरची किंमत 1,14,900 रुपयांपासून सुरू होते. तर 15 इंच स्क्रीन असणाऱ्या मॅकबुक एअर M3 ची किंमत 1,34,900 रुपये आहे. ही किंमत या मॉडेलच्या बेस व्हेरियंटची आहे. 16GB+512GB Macbook Air M3 (15 inch) मॉडेलची किंमत 1,74,900 रुपये एवढी आहे. (MacBook Air M3 Price)

अ‍ॅपलचे हे नवीन मॅकबुक एअर 6 मार्चपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध होतील. अ‍ॅपल स्टोअरमधून HDFC बँकेच्या कार्डने याची खरेदी केल्यास, तब्बल 8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

MacBook Air M2

अ‍ॅपलने जेव्हा मॅकबुक एअर M2 भारतात लाँच केला होता, तेव्हा त्याची किंमत 1 लाख 19 हजार 900 रुपये होती. मात्र, आता M3 मॅकबुक लाँच झाल्यामुळे याची किंमत तब्बल 15 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मॅकबुक एअर M2 हा 15 इंच स्क्रीन असणारा जगातील सर्वात थिन लॅपटॉप आहे, असं कंपनीने याच्या लाँचवेळी सांगितलं होतं. (MacBook Air M2 Price)

फीचर्स

या मॅकबुकमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले, 1080 फेसटाईम HD कॅमेरा, मॅगसेफ 3 चार्जिंग पोर्ट, दोन थंडरबोल्ट/USB 4 पोर्ट, पॅसिव्ह कूलिंग सोल्यूशन असे फीचर्स आहेत. याची बॅटरी तब्बल 18 तासांचा बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये सिल्व्हर, स्टारलाइट, स्पेस ग्रे, मिडनाईट असे चार रंग उपलब्ध आहेत. याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 24GB रॅम आणि 2TB पर्यंतचं स्टोरेज मिळते.

M1 मॉडेल्स केले डिस्कंटिन्यू

दरम्यान, नवीन M3 चिपसेट असणाऱ्या मॅकबुकच्या लाँचनंतर कंपनीने आपले M1 चिपसेट असणारे मॅकबुक बनवणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता केवळ नवीन चिपसेट असणारे मॅकबुक बनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT