iPhone in India eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone in India : भारतात अ‍ॅपल बनवणार वर्षाला 5 कोटी आयफोन! 'मेक इन इंडिया'ला मिळणार मोठा बूस्ट

हे शक्य झाल्यास जगातील एकूण आयफोनपैकी 25 टक्क 'मेड इन इंडिया' असतील.

Sudesh

लवकरच अ‍ॅपल कंपनी भारतात वर्षाला पाच कोटी आयफोन तयार करेल. कंपनीकडून याबाबत तयारी सुरू असून, येत्या दोन ते तीन वर्षात हे शक्य होणार असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे शक्य झाल्यास जगातील एकूण आयफोनपैकी 25 टक्क 'मेड इन इंडिया' असतील.

अ‍ॅपलने गेल्या आर्थिक वर्षात भारतात 58 हजार कोटींहून अधिक किंमतीचे आयफोन असेंबल केले होते. अ‍ॅपलसाठी आयफोन बनवणारी एक प्रमुख कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने गेल्याच महिन्यात भारतात सुमारे 13 हजार कोटींची गुंतवणूक करण्याबाबत घोषणा केली होती. कर्नाटकातील फॉक्सकॉन फॅक्टरीमध्ये पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनीची दुसरी फॅक्टरीही उभारण्यात येत आहे.

टाटा देखील बनवणार आयफोन

टाटा समूह देखील भारतात आयफोन निर्मितीमध्ये योगदान देणार आहे. तामिळनाडूमध्ये यासाठी कारखाने सुरू करण्याची टाटाची योजना आहे. दोन वर्षांमध्ये 20 असेम्बली लाईन सुरू करण्यात येतील, आणि त्याठिकाणी 50 हजार कर्मचारी असतील असं सांगण्यात येत आहे. टाटा ग्रुपने आयफोन निर्मितीसाठीच कर्नाटकातील विस्ट्रॉन फॅक्टरी देखील विकत घेतली आहे.

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतातून 5.5 बिलियन डॉलर्सहून अधिक किंमतीचे मोबाईल निर्यात झाले. यामध्ये आयफोनचा वाटा सर्वात मोठा होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग कंपनी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT