apple watch series 8 launched check price and specifications iphone 14 series launch
apple watch series 8 launched check price and specifications iphone 14 series launch  
विज्ञान-तंत्र

Apple watch 8 Series : तापमान सेन्सरसह मिळतं बरंच काही, जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

Apple ने नवीन स्मार्टवॉच Apple Watch Series 8 लाँच केले आहे. Apple वॉच 8 सीरीज टेंप्रेचर सेन्सरसह लॉन्च करण्यात आली आहे. यासोबतच Apple Watch SE देखील Apple Watch 8 सीरीज सोबत लॉन्च करण्यात आला आहे. Apple ने यावर्षी Apple Watch Ultra हे नवीन प्रॉडक्ट देखील लॉन्च केले आहे, जी आतापर्यंतचे सर्वात शानदार आणि पावरफुल स्मार्टवॉच असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Apple Watch 8 सीरीजमध्ये दोन टेंप्रेचर सेंसर देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन वॉच क्रॅक प्रूफ, वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. नवीन वॉचमध्ये पीरियड सायकल ट्रॅकर देखील आहे. त्याचे नोटीफिकेशन देण्याची सोय देखील यामध्ये देण्यात येणार आहे. पिरियड ट्रॅकर देखील शरीराच्या स्थितीनुसार पीरियड्सबाबत अलर्ट करेल. अॅपलच्या दाव्यानुसार, हा डेटा पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. Apple Watch Series 8 ला सेफ्टी फीचर म्हणून फॉल डिटेक्शन, क्रॅश डिटेक्शन आणि इमर्जन्सी अलर्ट देखील मिळेल. फॉल डिटेक्शन पूर्वीपेक्षा खूप फास्ट होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Apple Watch Series 8 ची किंमत

Apple Watch Series 8 ची किंमत $399 म्हणजेच जवळपास 32,000 रुपयांपासून सुरू होत आहे आणि GPS आवृत्तीची किंमत $499 म्हणजेच जवळपास 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही अमेरिकन बाजारातील किंमत आहे. Apple Watch SE ची किंमत $239 म्हणजेच अंदाजे 19,000 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, Apple Watch Ultra ही 89,900 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. 8 सप्टेंबरपासून या वॉचेस खरेदी करता येतील.

Apple watch 8 ULTRA चे स्पेसिफिकेशन्स

Apple Watch 8 ULTRA मध्ये चांगले स्पीकर आणि चांगली बिल्ड क्वालिटी देण्यात आली आहे. यात सर्वात मोठी म्हणजे 36 तासांची बॅटरी आणि पॉवर सेव्हिंग मोडमध्ये 50 तासांचे लाईफ मिळते. यासाठी वेगळ्या स्वरुपात वॉच फेसेस डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये नाईट मोड देखील देण्यात आला आहे. यात टायटॅनियम बकल देण्यात आले असून Apple वॉच 8 ULTRA एक रग्ड स्मार्टवॉच आहे. तुम्ही पाण्यात किती खोल आहात हे देखील अल्ट्रा वॉच तुम्हाला सांगेल. त्याची डिस्प्ले ब्राइटनेस 2,000 nits आहे आणि त्याची किंमत $ 799 ठेवण्यात आली आहे.

Apple watch SE - स्पेसिफिकेशन

नवीन Apple वॉच एसई पूर्वीपेक्षा चांगले बनवण्यात आले आहे. Apple Watch SE तीन रंगात उपलब्ध असेल. Apple Watch SE मध्ये इमर्जन्सी अलर्ट उपलब्ध असेल. Apple Watch SE Apple Watch 3 पेक्षा 30 टक्के मोठी असून यया मध्ये ECG फीचर उपलब्ध असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT