Valentine's Week Gift eSakal
विज्ञान-तंत्र

Valentine's Week : ऐनवेळी विसरलात कोणता दिवस आहे? पार्टनरसाठी 15 मिनिटात मागवता येतील गिफ्ट; 'हे' अ‍ॅप्स करतील मदत

Fast Gift Delivery : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या काळात कित्येक जण आपल्या पार्टनर्सवर गिफ्ट्सचा वर्षाव करतात. मात्र, कित्येक वेळा गिफ्ट विसरल्याचं आपल्याला ऐनवेळी लक्षात येतं.

Sudesh

Valentine's Week Gift Fast Delivery : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या काळात कित्येक जण आपल्या पार्टनर्सवर गिफ्ट्सचा वर्षाव करतात. गुलाब, चॉकलेट, टेडी अशा बऱ्याच भेटवस्तू गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांना देत असतात. मात्र, कित्येक वेळा गिफ्ट विसरल्याचं आपल्याला ऐनवेळी लक्षात येतं. अशा वेळी दुकानामध्ये जाऊन गिफ्ट आणण्याचा वेळ नसतो, तसंच पार्टनरची बोलणीही खायची नसते.

अशा वेळी तुमची होणारी फजिती टाळायची असेल, तर काही अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात. या अ‍ॅप्सवरुन तुम्ही अवघ्या 15 मिनिटांमध्ये चॉकलेट, टेडी किंवा अशीच अन्य लहान-सहान गिफ्ट्स मागवू शकता. ब्लिंकिट (Blinkit App) आणि झेप्टो (Zepto App) हे दोन अ‍ॅप्स तुमची यासाठी मदत करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये विविध प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देखील मिळतो.

चॉकलेट अन् टेडी

या दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही विविध प्रकारचे चॉकलेट्स आणि टेडी बिअर मागवू शकता. व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये येणाऱ्या 'चॉकलेट डे' आणि 'टेडी डे' या दिवशी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. दोन्ही अ‍ॅप्सवर कॅडबरी आणि सॉफ्ट टॉयवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध आहे. (Chocolate and Teddy)

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

या दोन्ही अ‍ॅप्सवर केवळ ग्रॉसरीच नाही, तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स देखील उपलब्ध आहेत. यातून तुम्ही आपल्या पार्टनरसाठी नेकबँड्स, इअर बड्स, स्मार्टवॉच, पॉवर बँक, इलेक्ट्रिक रेझर/शेव्हर अशा गोष्टी मागवू शकता. याव्यतिरिक्त या प्लॅटफॉर्मवर मेकअपचं सामानही उपलब्ध आहे. तसंच, ब्लिंकिटवर तर अगदी ज्वेलरी (इअर रिंग, नेकलेस) देखील मिळू शकते.

याव्यतिरिक्त तुम्ही या प्लॅटफॉर्मवरुन दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजी, ग्रॉसरी अशा गोष्टीही मागवू शकता. तुमच्या एरियानुसार अगदी पाच ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला या गोष्टी हातात मिळू शकतात. (Electronic gadgets)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: ५५ हजार ९६९ कोटींचे सामंजस्य करार, अर्थव्यवस्थेला बळ मिळणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Ranji Trophy: महाराष्ट्राचा मोठा विजय! पृथ्वी शॉच्या द्विशतकानंतर मुकेश चौधरी अन् रामकृष्ण घोषचा चंदिगढविरुद्ध तिखट मारा

Renault Duster: डस्टर येतेय! दमदार फिचर.. आयकॉनिक 'एसयूव्ही'ची प्रतीक्षा संपली; तारीखही झाली फायनल

Mumbai News: पुनर्विकासातून ६ लाख नवीन घरे! म्हाडा उपाध्यक्षांची माहिती; जपानच्या शिष्टमंडळाची मुख्यालयास भेट

Latest Marathi News Live Update : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT