faceapp
faceapp 
विज्ञान-तंत्र

नेटकऱ्यांना म्हातारं करणारं 'फेसअॅप' नक्की आहे तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंण्डिंगमध्ये असते. एखाद्या घटनेबाबतचे फोटो, मीम्स, व्हिडीओ व्हायरल होत राहतात. आज काय ट्रेण्ड सुरू आहे, आता सध्या काय ट्रेण्डमध्ये आहे याची नेटकरी दखल घेत असतात. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे फेसअॅपची. आपल्या म्हातारपणात आपण कसे दिसू याची जवळजवळ सगळ्यांनाच (मेकअप प्रेमी महिला वगळता) उत्सुकता असते. मी बरा/बरी दिसेन ना? याबाबत प्रत्येकाला काळजीवजा उत्सुकता असते. 

अनेक अभिनेते, अभिनेत्री यांना आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये तरूण तसेच वयस्कर भूमिका करताना पाहिले आहे. या अभिनेत्यांचे हे लूक मेकअप आर्टिस्ट तयार करत असतात. मात्र, आता घरबसल्या सर्वांना आपला म्हातारपणातील लूक बघता येणार आहे. फोटोशॉपच्या साहाय्याने आपण अनेक जुने फोटो रंगीत स्वरुपात पाहिले आहेत. तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत फोटो काढण्याची हौस फोटोशॉपच्या साहाय्याने पूर्ण करणाऱ्यांनाही आपण पाहिले आहे. अनेक अॅप्सच्या मदतीने फोटो एडीट करुन ते व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असाच एक ट्रेंण्ड सध्या दिसून येत आहे, तो म्हणजे नेटकरी त्यांच्या म्हातारपणातील लूक शेअर करत आहेत. सेलिब्रिटीजपासून सामान्यांपर्यंत अनेकांनी आपले म्हातारपणातील फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. 

दोन वर्षांपूर्वी फेसअॅप लॉन्च करण्यात आले होते. मात्र, आत्ता अचानक ते चर्चेत येण्याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, हजारोंच्या संख्येने नेटकरी हे अॅप वापरुन त्यांच्या म्हातारपणीचा लूक शेअर करत आहेत. या अॅपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स उपलब्ध आहेत, त्यापैकी ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले आहे. या फिल्टरचा वापर करुन अनेकजण आपला भविष्यातील चेहरा पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हे अॅप मोफत असल्याने नेटकऱ्यांनी आपण भविष्यात कसे दिसू या उत्सुकतेपोटी या अॅपवर उड्या घेतल्या आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही या अॅपने भुरळ घातली आहे. आपले भविष्यातील फोटो शेअर करण्यात खेळाडू आघाडीवर आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT