Ashwini Vaishnaw on Indian Smartphone eSakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Market : भारतात विक्री होणारे ९९.२ टक्के स्मार्टफोन स्वदेशी बनावटीचे; ९ वर्षांमध्ये २० पटींनी वाढलं उत्पादन

Ashwini Vaishnaw : जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशात ४.३ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली.

Sudesh

Indian Smartphone Market : गेल्या नऊ वर्षांमध्ये देशातील स्मार्टफोनचं उत्पादन तब्बल २० पटींनी वाढलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याबाबतच्या एका आढावा बैठकीनंतर त्यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत हे स्पष्ट केलं. देशात विक्री होणारे ९९.२ टक्के स्मार्टफोन हे 'मेड इन इंडिया' असल्याचं देखील वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.

केंद्रीय मंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘भारताचे मोबाईल फोन आयात करण्याचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. २०१४ मध्ये भारतीय मोबाईल उद्योग ७८ टक्के आयातीवर अवलंबून होता. म्हणजे देशातील ७८ टक्के मोबाईल फोन बाहेरून विकत घेतले जात होते. २०२३ मध्ये भारतात विकले गेलेले ९९.२ टक्के फोन हे ‘मेड इन इंडिया’ होते.’

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशात ४.३ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली असून मार्केट रिसर्च फर्म कॅनालिसच्या मते दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग १८ टक्के मार्केट शेअरसह अव्वल स्थानावर राहिला. या कालावधीत कंपनीने भारतीय बाजारपेठेत ७९ लाख स्मार्टफोनची विक्री केली.

त्याच वेळी शाओमीने गेल्या तिमाहीत ७६ लाख स्मार्टफोन्सची घाऊक विक्री केली आणि मार्केट शेअरच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी ७२ लाख स्मार्टफोनच्या विक्रीसह व्हिवो तिसऱ्या स्थानावर आहे; तर रिअलमी ५८ लाख घाऊक विक्रीसह चौथ्या स्थानावर आहे आणि ओपो ४४ लाख घाऊक विक्रीसह पाचव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT