asus rog phone 5  
विज्ञान-तंत्र

तब्बल 18 GB रॅम अन् बरंच काही! जाणून घ्या Asusच्या ROG Phone 5 चे दमदार वैशिष्ट्ये

शर्वरी जोशी

ग्राहकांचा कल पाहून जागतिक बाजारातदेखील स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरु आहेत. अनेक कंपन्या नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्टफोन तयार करत आहेत. यामध्येच आता Asus Republic of Gamers (ROG) या कंपनीने नवी ROG Phone 5 ही स्मार्टफोन सीरिज भारतीय बाजारपेठेत  लाँच केली आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिला 18 GB LPDDR रॅम असलेला हा स्मार्टफोन आहे. असूसच्या या सीरिजअंतर्गत ROG Phone 5 ,ROG Phone 5 Pro आणि ROG Phone 5 Ultimate (Limited) हे तीन नवे स्मार्टफोन भारतात दाखल झाले आहेत. हे तीनही मॉडेल्सना 144 हर्ट्ज सॅमसंग अॅमोलेड डिस्प्ले आहे. रॅम आणि स्टोरेजमुळे हे तीन्ही स्मार्टफोन भारतीयांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. या नव्या स्मार्टफोनची नेमकी वैशिष्ट्ये आणि किंमत किती आहे ते पाहुयात.

डिस्प्ले -
Asusच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट असून 6.7 इंच सॅमसंग एमोलेड स्क्रीन आहे. तसंच यांचा रिस्पॉन्स रेट 1ms आणि टच सॅम्पलिंग रेट 300 हर्ट्जचा आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या स्मार्टफोन्सला ऑन फिचर्स आणि एचडीआर 10+ सपोर्ट करतात.
रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसर -
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Asus ROG Phone 5 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 660 GPU, 12 GBपर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 GBपर्यंत इंटरनल स्टोरेज ( UFS 3.1) आहे. तसंच यात 3D वेपर चेंबर देण्यात आला आहे.
कॅमेरा -
या स्मार्टफोनचा बॅक कॅमेरामध्ये 64 मेगापिक्सल Sony IMX 686 कॅमेरा सेन्सर, अपर्चर एफ/1.8 आणि पिक्सल साईज 1.6 um  आहे. सोबतच 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेंन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेंन्सर देण्यात आला आहे. तसंच हँण्डसेटची व्हिडीओ क्षमता 8k इतकी आहे. त्यासोबतच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंन्सर देण्यात आला आहे.
बॅटरी -
Asus ROG स्मार्टफोनमध्ये ड्युअल -सेल 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून Gaming Smartphone 65 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. तसंच रिटेल बॉक्ससोबत 30 वॉटचा चार्जर देण्यात येतो. तसंच ही बॅटरी दिर्घकाळ चालण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये स्लो चार्जिंग, शेड्युल चार्जिंग आणि अन्य अनेक फिचर देण्यात आले आहेत.
ROG Phone 5 ची भारतातील किंमत
Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आलं असून या वेरिएण्ट स्मार्टफोनची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी आहे. तसंच या फोनच्या टॉप वेरिएण्टमध्ये 12 GB रॅम 256 GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 57 हजार 999 रुपये आहे. तसंच हा फोन ब्लॅक आणि रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
Asus ROG Phone 5 Pro -
Asusचा ROG Phone 5 Pro हा रिंगल वेरिएण्ट स्मार्टफोन भारतात दाखल झाला असून त्याच्यात 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज आहे. याची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.
Asus ROG Phone 5 Ultimate
या स्मार्टफोनमध्ये 18 GB रॅमसह 256 GB स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन 79 हजार 999 रुपये किंमतीचा असून याची विक्री 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 15 तारखेला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्डवर याची विक्री सुरु होणार असल्याचं सांगण्यत येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT