Ather 450X E-Scooter: अथर एनर्जीने 2025 साठी आपली 450X ई-स्कूटर अधिक अत्याधुनिक बनवत नव्या वैशिष्ट्यांसह लाँच केली आहे. अपडेट झालेले हार्डवेअर, नवीन रंगसंगती आणि जास्त रेंजसह ही ई-स्कूटर जुन्या डिझाईनसहच मार्केटमध्ये आली आहे.
अथर 450X मध्ये यावेळी हायपर सॅंड आणि स्टेल्थ ब्लू हे दोन नवीन रंग पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय, जुने रंग पर्याय जसे की ट्रू रेड, ल्युनर ग्रे, कॉस्मिक ब्लॅक, स्पेस ग्रे आणि स्टील व्हाइटही कायम आहेत. त्याचे स्पोर्टी डिझाईन आणि एरोडायनामिक लूक यामुळे ती आधीच ग्राहकांची आवडती होती.
2025 Ather 450X मध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांची भर घालण्यात आली आहे.
त्रिविध ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स आहेत. ज्यामध्ये रेन, रोड, आणि रॅली मोड्स.
मॅजिक ट्विस्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. ही ब्रेकिंग प्रणाली अधिक ऊर्जा वाचवण्यास मदत करते.
प्रो पॅक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. गुगल मॅप्स, अलेक्सा पिअरिंग, डॅशबोर्डवर व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन्स, पिंग माय स्कूटर आणि लाईव्ह लोकेशन शेअरिंगसारख्या स्मार्ट सुविधांचा समावेश.
नवीन टायर्समुळे अथर 450X च्या रेंजमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
2.9kWh व्हेरिएंट: आता 105 किमी रेंज, 20 किमीची वाढ.
3.7kWh व्हेरिएंट: 130 किमी रेंज, 25 किमीची वाढ.
सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टम जुन्याच ठेवण्यात आल्या असल्या तरी, 2025 Ather 450X मध्ये MRF Zapper N e-Tred टायर्स वापरण्यात आले आहेत. हे टायर्स 25% कमी रोलिंग रेसिस्टन्स देतात, ज्यामुळे रेंज वाढते आणि रायडिंग अनुभव अधिक स्मूथ होतो.
नवीन वैशिष्ट्यांमुळे या ई-स्कूटरच्या किंमतीत थोडी वाढ झाली आहे.
2.9kWh व्हेरिएंट: 1.47 लाख रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू).
3.7kWh व्हेरिएंट: 1.57 लाख रुपये.
हे अनुक्रमे 6,400 रुपये आणि 2,000 रुपयेने महाग झाले आहेत.
2025 Ather 450X ही केवळ एक ई-स्कूटर नसून ती प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरणपूरकता, आणि स्टायलिश डिझाईन यांचा संगम आहे. कमी खर्चात अधिक सुविधा आणि जास्त रेंज हवी असल्यास ही ई-स्कूटर ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.