ather 450x electric scooter with 15km range in 10 minute of charge see price features  
विज्ञान-तंत्र

10 मिनीट चार्ज केल्यास हे इलेक्ट्रिक स्कूटर चालेल 15km

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही दमदार रेंज आणि चांगला टॉप स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण अशाच एका स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत. या स्कूटरमध्ये तुम्हाला 110KM पेक्षा जास्त रेंज आणि 80 kmph चा टॉप स्पीड मिळेल. ही स्कूटर भारतीय इलेक्ट्रिक कंपनी Ather Energy ची ather 450x electric scooter आहे.

स्कूटरची किंमत काय आहे

Ather 450x इलेक्ट्रिक स्कूटर बंगलोर, नवी दिल्ली आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर नवी दिल्लीत Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,71,415 रुपये आहे. मात्र, राज्य सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर तुम्हाला ते 1,32,426 रुपयांना मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटरची ड्राइव्ह रेंज 116 किमी आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर 15KM धावेल, तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरला 6 kW ची मोटर देण्यात आली आहे, जी 2.9 kWh च्या लिथियम-आयन बॅटरीने जोडलेली आहे. जी मोटर 26Nm इन्स्टंट टॉर्क जनरेट करते. यात इको, राइड, स्पोर्ट आणि वार्प असे चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत. वार्प मोडमध्ये, ही स्कूटर 3.3 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते आणि तिचा टॉप स्पीड 80 kmph आहे. रेग्युलर होम चार्जर (5 amp) स्कूटरची बॅटरी 3 तास 35 मिनिटांत 0 ते 80 टक्के आणि 5 तास 45 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज करू शकतो. फास्ट चार्जरद्वारे बॅटरी 1.5 किमी/मिनिट वेगाने चार्ज करता येते. म्हणजेच, 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर तुम्हाला 15KM पर्यंतची रेंज मिळेल.

फीचर्स

450X इलेक्ट्रिक स्कूटर व्हाइट, ग्रे आणि मिंट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. नवीन 450X मध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड दिला आहे, जो स्नॅपड्रॅगन 212 क्वाड-कोर प्रोसेसरने 1GB RAM आणि 8GB स्टोरेजसह जोडलेला आहे. हे 4G सिम कार्डसह सुसज्ज आहे आणि वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट देते. यात मॅप नेव्हिगेशन, ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स आणि ओव्हर-द-एअर अपडेट्स, ऑटो इंडिकेटर ऑफ आणि गाइड-मी-होम लाइट यांसारखी इतर फीचर्स देखील मिळतात. हे स्मार्ट हेल्मेट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारख्या कनेक्टेड अॅक्सेसरीजना सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT