ather energy registers 366 percent sales growth from last year January record 2825 electric scooters sales  
विज्ञान-तंत्र

'या' इलेक्ट्रिक स्कूटर्सची होतेय जोरदार विक्री, नोंदवली 366% वाढ

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric Vehicle) कंपनी एथर एनर्जी (Ather Energy)ने जानेवारी महिन्यात अत्यंत चांगली कामगीरी नोंदवली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने तब्बल 2,825 इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) विकल्या, जो कंपनीसाठी एक विक्रम आहे. Ather Energy रिपोर्टमध्ये माहिती दिली की जानेवारी 2022 मध्ये, त्यांच्या विक्रीत वार्षिक 366 टक्के वाढ झाली आहे. कंपनी सध्या तिच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर - Ather 450 Plus आणि Ather 450X भारतात विकते.

कंपनीने अलीकडेच जानेवारीमध्ये आपला रिटेल फुटप्रिंट एक्सपांड केला आहे. कंपनीने नागपूर आणि लखनौ येथे नवीन एक्सपिरिएंस सेंटर उघडले आहेत. एथर एनर्जीचे सीबीओ, रवनीत फोकेला म्हणाले की, सप्लाय चेनमधील आव्हानांमुळे कंपनी डिमांड पूर्ण करू शकत नाही. EVs ची वाढती मागणी लक्षात घेऊन, Ather भारताच्या विविध भागात नवीनएक्सपिरिएंस सेंटर सुरु जोडत आहे, असेही ते म्हणाले. कंपनीकडे सध्या भारतातील 24 शहरांमध्ये 29 रिटेल आउटलेट आणि 304 फास्ट चार्जिंग एथर ग्रिड पॉइंट आहेत.

Ather 450 Plus आणि Ather 450x इलेक्ट्रिक स्कूटर्स बऱ्याच अंशी दिसण्यात सारख्या आहेत, मात्र त्यांच्या कार्यक्षमतेत फरक आहे. Ather 450 Plus स्कूटरमध्ये 5.4kW मोटर आणि 2.9kWh बॅटरी आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 80kmph आणि ती 3.9 सेकंदात 40Kmph गाठू शकते. पूर्ण चार्ज केल्यावर ते 75 किमी पर्यंतची रेंज देते. यात स्पोर्ट्स, राइड आणि इको असे तीन रायडिंग मोड आहेत.

त्याच वेळी, जर आपण Ather 450x बद्दल बोलायचे झाल्यास, तर त्यात 6kW मोटर आणि 2.9kWh बॅटरी आहे. यात इको, राइड, स्पोर्ट आणि वार्प असे चार राइडिंग मोड आहेत. वार्प मोडमध्ये, ही स्कूटर 3.3 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते आणि तिचा टॉप स्पीड 80 kmph आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 80 किमी पर्यंतची रेंज देते. दोन्ही स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात.

स्कूटरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलते. बेंगळुरूमध्ये, Ather 450 Plus ची किंमत 1,31,647 रुपये आहे. Ather 450X ची किंमत 1,50,657 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT