ATM Card esakal
विज्ञान-तंत्र

ATM Card : एटीएम कार्ड विसरलं टेन्शन नॉट ! चक्क फोनद्वारे काढता येतील एटीएममधले पैसे

अनेकदा असे घडते की आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवायला विसरतो

सकाळ डिजिटल टीम

ATM Card : अनेकदा असे घडते की आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवायला विसरतो. अशा परिस्थितीत यूपीआय आपल्यासाठी उपयुक्त आहे. UPI वापरुन आपण कोठूनही सहजपणे ऑनलाइन पेमेंट करू शकतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल जिथे फक्त cash हा एकमेव पर्याय आहे. अशा वेळी टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? याचं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला आता UPI द्वारे कोणत्याही ATM मधून पैसे काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला ही सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

CCW सेवा: कार्डशिवाय पैसे काढा

इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल म्हणजेच ICCW ही एक सेवा आहे जी वापरकर्त्यांकडे कार्ड नसतानाही एटीएममधून पैसे काढण्यास मदत करते. ही कार्डलेस कॅश काढण्याची सेवा स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक आणि इतर बँकांच्या ATM वर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. UPI मधून पैसे काढण्यासाठी वापरकर्ते GooglePay, PhonePe, Paytm आणि इतर UPI अॅप्स वापरू शकतात.

UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे

1. यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही एटीएम मशीनमध्ये जा.

2. यानंतर, स्क्रीनवर रोख पैसे काढण्याचा पर्याय निवडा.

3. यानंतर UPI पर्याय निवडा.

4. UPI पर्याय निवडल्यानंतर, ATM स्क्रीनवर QR कोड दिसेल.

5. हा कोड स्कॅन करण्यासाठी तुमच्या फोनवर UPI अॅप उघडा आणि ATM मशीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा.

6. यानंतर, तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका. यामध्ये तुम्ही 5,000 रुपयांपर्यंतची रोकड काढू शकता.

7. यानंतर UPI पिन टाका आणि Proceed च्या पर्यायावर क्लिक करा.

8. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमधून पैसे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT