Auto Care Gear esakal
विज्ञान-तंत्र

Auto Care Gear : गिअर बॉक्सच गणित डोक्यात फिक्सच करा; कार असो वा बाईक कसलीच अडचण येणार नाही!

गिअर ऑईलबाबत आपल्याला काही खबरदारी घेण्याची गरज आहे

Pooja Karande-Kadam

 Auto Care Gear : लाँग ड्राईव्ह पे चल मेरे नाल, असं म्हणत तुम्ही जेव्हा गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाता. तेव्हा नेमकी आपली बाईक असो वा कार बंद पडते. बाहेरून तरी तिला काही झालं नाही असं वाटतं पण खरं तर प्रॉब्लेम तिच्या गिअर बॉक्सला आलेला असतो.

कार किंवा बाईकमधील कोणत्याही आवश्यक भागाची चर्चा होते तेव्हा लोक फक्त टायर, बॅटरी आणि इंजिनपुरते मर्यादित असतात. पण एक महत्त्वाचा भाग असाही आहे की खराब झाल्यास गाडी एक इंचही पुढे सरकत नाही.

ते दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. हा भाग म्हणजे गाडीचा गिअर बॉक्स. आणि गिअर बॉक्समध्ये बिघाड होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गिअर ऑईल कमी होणे किंवा कालांतराने त्याचे खराब होणे.

काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण गिअर बॉक्सचे लाईफ तर वाढवू शकतोच पण आपली ड्राइव्ह ही सुरक्षित आणि सुरळीत करू शकतो. गिअर ऑईलबाबत आपल्याला काही खबरदारी घेण्याची गरज आहे. गिअर ऑईलचा आपल्या कार आणि बाइकवर कसा परिणाम होतो आणि त्याबद्दल कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

गिअर कसे काम करतात

क्लच आणि गीअर हे दोघेही कारचे कान आणि डोळे असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण अखेरीस सर्व त्याच्या नियंत्रणावरच गाडीची यंत्रणा अवलंबून असते. इंजिनात निर्माण झालेली शक्ती ही पिस्टन आणि क्रँकमधून मागील चाकापर्यंत पोहोचवली जाते. ही क्रिया होताना क्लच आणि गीअर्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. गाडी सुरू केल्यावर इंजिन चालू होऊन शक्ती निर्माण करायला सुरुवात करते. 

ऑईल खराब आहे की नाही हे कसे ओळखावे

- गिअर ऑईल खराब होण्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे गिअर बदलण्यात अडचण. गिअर बदलताना गुळगुळीतपणा संपला की इंजिन ऑईल बिघडू लागलं आहे, हे समजून घ्यायला हवं.

- गिअर बदलताना आवाज येत असेल तर लगेच दोन गोष्टी तपासून घ्या. पहिली म्हणजे क्लच प्लेट आणि दुसरी म्हणजे इंजिन ऑईल लेव्हल. इंजिन ऑईलची पातळी कमी असल्याने गिअर बदलण्यात आवाज येतो आणि त्यामुळे गिअर बॉक्स तसेच क्लच प्लेटचे नुकसान होते.

- जर समोर तेलाचा डाग असेल किंवा गाडीखाली टपकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जिथून तेल गळत आहे त्या गिअर बॉक्सच्या सीलमध्ये बिघाड होण्याचे हे लक्षण असू शकते. असे झाल्यास ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावे.

काय होणार नुकसान

- गिअर ऑईल कमी असेल तर त्याचा थेट परिणाम गिअर बॉक्सवर होतो. यामुळे गिअर्स नीट बसवले जात नसल्याने इंजिनची पॉवर कमी होते.

- गिअर नीट बसवले नाही तर क्लच प्लेटवर सतत परिणाम होतो आणि ते वेगाने खराब होऊ लागतात. ज्यामुळे गाडीच्या आत जळत्या रबरसारखा वास येतो.

- समोरचे आणि विशेषत: मागचे गिअर घातले जाते आणि प्रॉब्लेम्समुळे गिअर्स पोझिशनमध्ये येतात तेव्हा कारमध्ये खूप मोठा आवाज होतो. जेव्हा असे होते तेव्हा गिअरची चाके देखील हळूहळू खराब होतात आणि नंतर गाडीचे गिअर ठेवणे अधिक कठीण होते.

किती असते किंमत

गिअर बॉक्स खराब झाला तर त्याची किंमत २५ ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान असते. हे कारच्या मॉडेल आणि मेकवर अवलंबून असते. तथापि, कधीकधी हा खर्च जास्त असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT