Auto
Auto google
विज्ञान-तंत्र

Auto : मारुती सुझुकीने थांबवलं अल्टो 800 चं प्रोडक्शन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने त्यांचं एंट्री-लेव्हल मॉडेल, Alto 800 बंद केली आहे. मारुतीने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅकचं उत्पादन थांबवल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

रिपोर्टनुसार, BS6 फेज 2 नियमांचं पालन करताना Alto 800 अपग्रेड करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नसल्याने कंपनीने ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. (Auto: Maruti Suzuki has stopped the production of Alto 800) हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि विक्रीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, शशांक श्रीवास्तव म्हणाले की, "आमच्या निरीक्षणानुसार, एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटचा खप कमी व्हायला लागला आहे. या सेगमेंट मधील वाहनांच्या अधिग्रहणाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादनाचा खर्च ही वाढला आहे."

शिवाय, रोड टॅक्स, मटेरिअल कॉस्ट आणि इतर प्रकारच्या करात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या अधिग्रहणाची किंमत वाढली आहे.

या सेगमेंट मधील गाड्यांच्या किमती वाढल्या मात्र त्या तुलनेत ग्राहकांच्या उत्पन्नाची पातळी वाढलेली नाही, असंही श्रीवास्तव म्हणाले.

Alto 800 चं उत्पादन थांबवणारा आणखी एक घटक म्हणजे Alto K10 ची वाढलेली मागणी.

श्रीवास्तव सांगतात, "आम्ही अल्टो 800 बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोणत्याही परिस्थितीत, या सेगमेंटमध्ये यापुढे Alto K10 हे आमचं मुख्य मॉडेल असेल."

या निर्णयामुळे, Alto K10 आता मारुतीची एंट्री-लेव्हल मॉडेल असेल. या गाडीची किंमत ₹ 3.99 लाख आणि ₹ 5.94 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे.

मारुती सुझुकीच्या वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे, अल्टो 800 ची किंमत ₹ 3.54 लाख आणि ₹ 5.13 लाख (दिल्लीमध्ये एक्स-शोरूम) दरम्यान होती.

मारुतीने 2010 पर्यंत कारच्या 1,800,000 युनिट्सची विक्री केली होती. त्यानंतर, Alto K10 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली. 2010 पासून आजपर्यंत, मारुतीने Alto 800 च्या 1,700,000 युनिट्स आणि Alto K10 च्या 950,000 युनिट्सची विक्री केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

SCROLL FOR NEXT